रिंगटोन्सच्या रम्य राज्यात!!

रिंगटोन्सबद्दल माझ्याजवळ असलेली काही उपयुक्त माहिती व टीप्स सगळ्यांना माहिती व्हाव्यात व आणखी काही माहितीची देवाण घेवाण एकमेकांत करता यावी यासाठी हा चर्चेचा प्रस्ताव.

आजकाल प्रत्येकाजवळ मोबाईल असतो. ज्यांचेजवळ साधा मोबाईल असतो (ज्यात फक्त साधे रिंगटोन्सच वाजू शकतात)त्यांच्या प्रत्येक रिंगटोन्साचा आवाज / टोन / पीच हा जवळपास सारखाच असतो. उदाहरणार्थ- नोकिया ११००.

पण ज्यांचेजवळ 'एमपी थ्री' रिंगटोन्स ची सोय आहे, त्यांच्यासाठी खालील उपयुक्त माहिती/शिफारस देत आहे-

जर साधे संगीत/गाणे असलेला रिंगटोन आपण लावला तर बाहेर गर्दीत तो ऐकू येत नाही. व्हायब्रेशन जरी असले तरी काही वेळा बॅगमध्ये किंवा इतरत्र मोबाईल असल्यास व्हायब्रेशन न जाणवण्याची शक्यता असते. यावर एक साधा उपाय आहे.

आपणांस माहिती असेल की बासरी किंवा शिटी चा टोन/पीच जास्त असतो कारण त्यांची फ्रिक्वेन्सी (वारंवारिता) जास्त हर्टझ असते व ऐकायलाही ते मधूर असतात. या साध्या तत्त्वाचा वापर करून आपण जर खालीलप्रमाणे केले तर ते फायदेशीर ठरते.

  • गूगल वर जावून 'एमपी थ्री कटर/क्लीपर'  नावाचा प्रोग्राम सर्च करा.
  • सर्च झालेल्यापैकी काही फ्रीवेअर असतील ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
  • मग आपल्या आवडीचे 'एमपी थ्री' गाणे ज्यात शिटी किंवा बासरी असेल त्या गाण्यातील शिटीचा/बासरीचा तेवढा भाग कट करा. तो नंतर आपल्या मोबाईलमध्ये कॉपी करा आणि रिंगटोन म्हणून सेट करा.
  • आवाज मोठा असला तरी त्याचा त्रास होत नाही आणि खुप दूरपर्यंत आवाज ऐकूही येतो.
  • 'कूल एडीट' नावाचा प्रोग्राम असेल तर त्यावर व्हॉल्यूम वाढवताही येतो व गाण्यात इको, नॉईस रिडक्शन असे काही खास वैशिष्ट्येही वापरता यतात.

काही प्रसिद्ध गाणे ज्यत शीटी आणि बासरी आहे.

शिटी :

  • ए मेरे हमसफर -बाजीगर
  • चोरी चोरी जब नजरे मिली -करीब
  • चांद सिफारिश - फना
  • किसका है ये तुमको - मै हूं ना
  • सपने मे मिलती है - सत्या
  • छोड आये हम - माचीस
  • प्यार तो होना ही था - शिर्षक गीत
  • धूम अगेन - धूम टू

बासरी :

  • निंदिया से जागी - हिरो
  • तनहा तनहा - रंगीला
  • मेरी तरह तुम भी कभी - क्या यही प्यार है
  • इधर चला मै उधर चला - कोई मिल गया

काय मग, करून बघणार ना हा प्रयोग?

इतर हिंदी व मराठी गाण्यांत असलेली शिटी/बासरी कुणाला आठवली तर ती येथे सांगावी. एक अनोखा संग्रह होईल.