दाक्षिणात्यांची आडनावे आणि इंग्रजी अक्षरे

अलिकडेच मनोगतावर दक्षिण भारतीय नेत्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाविषयी चर्चा झाली. या चर्चेतील प्रतिसाद वाचताना श्री. आजानुकर्ण यांनी दिलेल्या दुव्यातील यादी पाहण्यात आली. सर्व नावे पाहताना ती व्यक्तिनाम, आडनाव अशा पद्धतीने आल्यासारखी जाणवतात. मात्र अलिकडे दाक्षिणात्य लोकांची नावे वाचताना त्यांच्या नावाच्या प्रारंभी इंग्रजीतील अद्याक्षरे वापरलेली असतात. उदा.  K. श्रीकांत, J. जयललिता, इ.  अशी इंग्रजी अद्याक्षरे वापरण्याची पद्धत इंग्रजांच्या संपर्कातून सुरू झाली, हे उघड आहे. मला प्रश्न असा पडला, की ही प्रथा नेमकी कोणी, केव्हा व का सुरू केली? त्यापूर्वी नावे ठरविण्यासाठी नेमकी काय पद्धत असावी?