राज ठाकरे आणि मराठी भाषा !!

ऱाज ठाकरे आज जे काही करत आहेत ते अतिशय स्वागतार्ह आहे आणि आपण सर्वांनी त्याला पाठींबा दिलाच पाहिजे... मी स्वतः प्रामुख्याने मराठीतुनच बोललो.. अगदीच गरज पडली तर हिंदी किंवा ईंग्रजी! परंतु मराठीत बोलतो हे पाहून अनेकांना वाटत असेल कि हिंदी/ईंग्रजी येत नसेल! तसा समज करून घेण्याची कोणीही हिम्मत करू नये.. कारण आपण मराठी लोक अनेकदा बाकी लोकांपेक्षाही उत्तम ह्या भाषा बोलू शकतो...! मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल, कस्टमर सर्विस इंडस्ट्री येथे सगळीकडे मी सुरुवात ईंग्रजी ने करतो अन समोरच्याला काही बोलून द्यायच्या आतच त्याला सांगतो की जरी मी सुरुवात वेगळ्या भाषेत केली असली तरी "I prefer taking in MARATHI"! ह्या वक्यावर समोरचा माणूस पुरता गोंधळून जातो.. आणि मग तो भले कोणत्याही भाषेत उत्तर देवो.. मी फक्त मराठी'च बोलतो.. अगदीच समोरचा माणूस हतबल झाला तर २-३ हिंदी-ईग्रजी शब्द वापरतो!

सर्वांनी मिळून मराठीवर ठाम राहिले तर ह्या परप्रांतीयांना मराठी शिकाविच लागेल!

*माझा मुद्दा भाषिक राजकारणाचा नाही परंतु "जेथे जावे तेथील होउन राहावे" हा मार्ग मला पटतो.. महाराष्ट्रात बाकिच्या भाषा बोलतातच की पण त्याचा अर्थ असा नाही कि मराठी शिकणारच नाही आणि बोलणारच नाही...! तसा उद्दामपणा केल्यास मग साम-दाम-दंड-भेद आचरणात आणावाच लागेल!!