आर्थिक मंदीला अमेरिका जबाबदार आहे का ?

काही दिवसांपासून रोज आर्थिक मंदीच्या बातम्या मी वाचतोय. मला अर्थशास्त्रातलं काहिच कळत नाही. पण ह्या मंदिची सुरुवात अमेरीकेत (आणि अमेरिकेमुळे) झाली असावी असं मला वाटतय. श्री. मिलिंद जोशी यांच्या "तेलही गेलं अन तुपही गेल.... " या लेखात पहिल्या भागात शेवटी लिहिलय की तेलाच्या अश्या वापरामुळे आणि मर्यादीत साठ्यांमुळे आर्थिक मंदी येईल. परंतु मला ते फारसं कळलं नाही. बहुदा माझा अर्थशास्त्राचा पायाच नाही म्हणून असेल कदाचित.

मला पडलेले काही प्रश्न.

१. आर्थिक मंदी का येते ?

२. त्यासाठी विकसित राष्ट्र्च (उदा. अमेरिका) जबाबदार असते का ?

३. या मंदीचा भारतावर किती परिणाम झाला आहे ? आणि यापुढे किती होणार ?

(मी म. टा. वर बघितलं 'बघा विडिओ' की सुमारे २०००० परदेशस्थ भारतीयांची नोकरी गेली)

४. यावरील उपाय काय?

५. या मंदीच्या काळात काय करावे आणि काय टाळावे.

६. ह्या मंदीचा शेअरबाजाराशी किती जवळचा संबंध आहे ?