आपण चर्चा का करतो ?

चर्चेचा विषय वाचून काही लोकांना मजा वाटेल, पण हा माझ्या एका मित्राला पडलेला प्रश्न आहे. त्याच्या मते ऑनलाईन चर्चा म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणे. कारण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही फक्त स्वतःचे विचार मांडणे, आणि कोण्यातरी दुसऱ्या टोकावर असलेल्या कुणालातरी (तो/ ती कोण आहे हे माहिती नसतांना) स्वतःचे विचार पटवून देण्यासाठी, की-बोर्ड बडवणे, यापलिकडे चर्चा म्हणजे काहीच नाही, असं तो म्हणतो.

पण मला त्याचं मत अजिबात पटलं नाही. मला वाटते, की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्यामुळे तो एकटा राहू शकत नाही, मग तो कधी ऑफलाईन तर कधी ऑनलाईन समुह शोधतो, जो त्याच्या विचारांशी, प्रदेशाशी किंवा कामाशी संबंधित असेल.

पण चर्चेचा फायदा काय ? या प्रश्नाच समाधानकारक उत्तर मला मिळालं नाही.

तुमच्याकडे आहे ?