ठुमकत ना चालावे - असे हे जग वैरी

नायक : ठुमकत ना चालावे - असे हे जग वैरी
तुज लागे सोळावे - असे हे जग वैरी
नायिका : मी नसे कुणाला भीत - असो हे जग वैरी
मज तुजवर जडली प्रीत - असो हे जग वैरी ।ध्रु।

नायक : हे गौरांगी शशिवदने - तू थांबव येणे जाणे
माझ्यासम कोणी वेडा - तुजला अडवील अशाने
नायिका : कुणि लाख पहारे लावो - येइन तोडून पहारे
मी तृषित तुझ्या भेटीची - येइन सोडुन जग सारे ।१।
नायक : ठुमकत ना चालावे - ...

नायक : प्रीती सागर आगीचा - तू नीट बघून उतरणे
शेकडो वादळे उठती, - सोपे ना यावर तरणे
नायिका : प्रेमाच्या गाठी बसल्या, - मग प्रलय असो वा ज्वाळा
जळते ते यौवन कसले, - भीती कसली प्रीतीला ।२।
नायक : ठुमकत ना चालावे - ...

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचल्यास तेही कळवा