कोणती सेना ?

निकाल लागला. शिवसेनेला (युतीला) मुंबईत जागा वाढवता आल्या नाही तर लाखाच्या वर मतं घेउन मनसेनं शिवसेनेचं नाक कापलं. आता चर्चा सुरू आहे, विधानसभेत काय होईल. शिवसेनेचे नेते कधी मनसेला छोटा पक्ष म्हणतात तर कधी त्यांनी आमची मतं खाल्ली म्हणतात. बाळासाहेबांनी चिडून (का निराश होवुन) "राज"शी संबंध तोडले.

राज उद्धवपेक्षा उजवे आहेत असं काहींना वाटतं, तर जो स्वताच्या काकाचा झाला नाही तो इतरांचा काय होणार असे काही लोकं विधान करत आहे.

या पार्श्वभुमीवर आपल्याला काय वाटते?
१. राज उद्धवपेक्षा अधिक चांगले राजकारणी नेते आहेत ?
२. मनसे विधानसभेत शिवसेनेच्या सर्व जागांवर (जर २८८ लढवल्या तर) विजय मिळवू शकेल?
३. मनसे एक स्वतंत्र पक्ष म्हणून सत्तेवर येवू शकेल ?
४. राजवर टीका करून व त्यांना डिचवून उद्धवने स्वताचे नुकसान करून घेतले आहे का ?
५. मनसे आणि शिवसेनेचं भविष्य काय असेल ?
या व्यतिरिक्त काही.

आपल्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत.....