स्ट्रिपिंग द गुरूज्

काही दिवसांपूर्वी मनोगत वर कोलबेर यांचा 'वायरिंग लोचा' हा लेख वाचला. त्या लेखावरील प्रतिसादात लोकांनी स्त्रीत्वाच्या प्रेरणा ह्यावर देखिल भाष्य केले आहे. त्यावरून मला काही दिवसांपूर्वी नेटवर वाचलेलं स्ट्रिपिंग द गुरुज् ह्या 'महान' पुस्तकाची आठवण झाली. जेफरी फॉक ह्या लेखकाने अध्यात्मिक गुरूंचा (जवळ जवळ सगळे भारतीय) ह्यांचा 'परदा फाश' केला आहे. त्यामधले सगळे गुरू हे आधुनिक (म्हणजे गेल्या दिडशे वर्षातले) असून त्यामध्ये रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद ह्यांचा देखिल समावेश आहे. पुस्तक इथे आहे  दुवा क्र. १
           ह्या पुस्तकामध्ये रामकृष्ण परमहंस ह्यांच्यामध्ये स्त्रीत्वाची लक्षणे होती (ती कशी होती ते वाचकांनी कृपया स्वतः वाचावे. माझ्याच्याने लिहिले जाणार नाही) व ते समलिंगी उपभोगी होते व स्वतःच्या लहान शिष्यांचा लैंगिक छळ कसा करत असत वगैरे 'सो कॉल्ड मेटिक्युलसली इन्वेस्टिगेटेड' विवेचन आहे. हे पुस्तक वाचल्यावर आधी खूप अस्वस्थ झालो मग राग आला मग शांतपणे विचार केल्यावर काही प्रश्न मनात आले.  परमहंसांविषयी दिलेल्या गोष्टिंमध्ये थोडेफार जरी तथ्य असेल तरी, अशा 'स्त्रीत्वाच्या प्रेरणा' वगैरे निर्माण करण्याची काय आवश्यकता होती? त्याचा त्यांना व त्यांच्या शिष्यांना काय फायदा झाला? प्रत्येक गुरूचा आणि त्यांच्या सेक्शुअल प्रॅक्टिसेस व प्रेफरन्स चा संबंध हा कश्याप्रकारे लावणे योग्य ठरेल? सामान्य जनता ह्या एन्लाइटंड गुरुंच्या ह्या वैयक्तिक गोष्टींकडे भोळेपणाने डोळेझाक करते की खरोखरच गुरुंना काही अश्या गोष्टी समजलेल्या असतात ज्या सामान्य माणसाच्या आकलनापलिकडे असतात?

 मनोगतींचा अनुभव काय आहे? तसेच, त्या पुस्तकाविषयी आपले मत वाचायला आवडेल.
(प्रशासकांसाठी - "लेखन प्रकार" किंवा "लेखन विषय" ह्यामध्ये 'पुस्तक परिचय' किंवा 'पुस्तक चर्चा' असल्यास बरे होईल.)