चित्तथरारक सत्यकथा !!!

कशी कुठून सुरुवात करावी काही कळत नाही. एक सत्यकथा मांडून सगळ्यांना सावध करायचा फक्त हाच हेतू...

ठिकाण :- दिल्ली ... दुबई

तारीख :- नक्की माहीत नाही . असेल जानेवारी महिना

माझ्या मैत्रिणीच्या नात्यातली गोष्ट ..

तिच्या नातातल्या एका भावाचे( नाव समीर देऊ) लग्न झाले जानेवारी मध्ये आणि नवविवाहितं जोडपे हनीमूनला गेले दुबईला. तिथे एका नामवंत हॉटेलात बुकिंग करून आजूबाजुची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यात काही दिवस भुर्रकन उडून गेले.

ज्या हॉटेलात राहत होते त्या हॉटेलातील शेजारच्या खोलीत राहणाऱ्या एका "शेख" शि ओळख झाली आणि ३-४ दिवस गप्पागोष्टी झाल्यावर त्या शेखने त्या नवविवाहितं जोडप्याला घरी जेवणाचे निमंत्रण दिले. ते उभयंता जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा दुबईतल्या पद्धतीप्रमाणे शेखने त्याच्या बायकोला आतल्या खोलीत शेखच्या बायको बरोबर बसायला सांगितले. शेखची बायको येऊन तिला आतल्या खोलीत घेऊन गेली.

समीर आणि शेख ह्यांच्या गप्पा आणि जेवण उरकल्याबरोबर समीरने शेखचा पाहुणचाराचे कौतुक करून निरोप घेऊन उठला आणि म्हणाला " तुमच्या बायकोला सांगून माझ्या बायकोला बोलावता का ? आम्ही निघतो आता. त्यावर तो शेख म्हणाला " कोणती बायको. तू येताना एकटाच आला होतास . त्यावर समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. समीर त्याच्या गयावया करू लागला. आतल्या खोलीत जाउन पाहूनही आला . आत मात्र एकदम चिडीचूप शांतता होती. कुठल्या हि बाईचा मागमूसही नव्हता .समीर त्या शेखच्या अंगावर धावुन गेला पण तिथे तो एकटा पडला आणि त्या शेखच्या अंगरक्शकाने समीरला घराबाहेर काढले.

समीरने बरेच प्रयत्न केले ... दुबई पोलिसांची मदत घेऊ पाहिली. पण पदरात नुसते नैराश्यच आले.

नंतर मी ऐकले की दुबई पोलिस पूर्णं जगात सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी आहे.

सध्या समीर दिल्लीत परत आला आहे आणि हवालदिल झाला आहे.

बायको बद्दल :- ह्युमन रिसोर्स मध्ये एम. बी. ए केले होते म्हणे आणि एका नामवंत आय. टी कंपनीमध्ये कार्यरत होती.

त्याच्या बायकोचे आईवडील सैरभैर झाले आहेत. प्रयत्न चालू आहेत तिला शोधण्याचे पण... माहीत नाही कधी यश येईल...

तेव्हापासून आतापर्यंत मन नुसते सुन्न झाले आहे ... देव करो आणि ती परत मिळो...