कोणतही काम छोटं ? की ते करणारे छोटे (हीन)? की त्या कामाच्या बाबतीत असा विचार करणारेच ?

टायटन ची जाहिरात...."आमीर खान एका क्लायंट चा कॉम्प्युटर दुरुस्त करून देतो... मॅनेजिंग डायरेक्टर असून... ते समजल्यावर प्रतिप्रश्न करणारा क्लायंट विचारतो.. सर, लेकीन आप क्यूं > -त्यावर आमीर चे उत्तर - काम बडा या छोटा नही होता सर.. काम, काम होता !!"

डी कंपनी चा देशू -- "कोई काम छोटा नही होता, बस् उसे करने वाला छोटा होता है.. "

अमेरिकेतून शिकून आलेला माझा मित्र -- "तिकडे तर स्टुडंटस कॅफे अट्टेंडंट,वेटर, डिलिव्हरी बॉय,क्लिनर... कोणतीही काम करून पैसे कमावतात... पैसे मिळतात, वेळ जातो, खूप शिकायला मिळतं... आणी काहीच वाटत नाही -- ना त्यांना ना आम्हाला.. !"

स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी तेवढी चांगली आणि बाकी करतात ते फालतू काम... ही विचारसरणीच मुळात चुकीची  आहे असे वाटत नाही का ? आपला तो बाळ्या आणि लोकाचं ते कार्टं ?  तुम्ही तुमच्या कामाबद्दल आदर बाळगता...सर्वांनाच असतो... दुसऱ्यांच्या कामाबाबत पण तेवढाच आदर ठेवणे खरे तर अपेक्षित आहे... पण अगदीच ते नसेल जमतं.. तर निदान गप्प राहावे.... उगीच टिका आणी हीन प्रकाराने त्याची हेटाळणी का करावी ?  

तुमचे काम कितीही महत्त्वाचे असो....पण त्याची उंची/महत्त्व जर दुसऱ्याच्या कामाला दुय्यम लेखून  वाढवण्याची गरज पडत असेल तर मात्र ते काम नसून केवळ दिखावा आहे... !  काल एका प्रसिद्ध दैनिकात छापून आलेल्या लेखात एका मनुष्याने आपल्या अकलेचे तारे असेच तोडले आहेत.... ते योग्य वेळी सांगतोच.. पण त्या आधी असा विचार आला की एकंदर ह्या प्रश्नावर लोकांचे मत काय आहे ते तरी पाहावे... कि मी एकटाच आहे ज्याला त्या बातमीमुळे चीड आली !!

कृपया मतप्रदर्शन करावे --> कोणतंही काम छोटं? का ते करणारे छोटे (हीन)? का त्या कामाच्या बाबतीत असा विचार करणारेच?

--

आशुतोष दीक्षित.