अकरा-अकरा-अकरा

नमस्काऽर मंडळी,

कालची/आजची तारीख बघितलीत का? अकरा नोव्हेंबर २०११. संक्षिप्त लिहिली तर ११-११-११ होते.या कट्ट्यावर अकरा या संख्येची महती सांगणारे प्रतिसाद लिहूयात.
"मनोगत"वर याआधीही आपण असे उपक्रम (की उपद्व्याप? ) केले आहेत-
चला मग करूया सुरुवात? या कट्ट्यावर अकरा या संख्येची महती सांगणारी माहिती, वाक्प्रचार, म्हणी, कविता, श्लोक, सुविचार, घटना, किंवा अजून असे बरेच काही लिहूयात. गणिती, भाषिक, सांस्कृतिक, पारंपरिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक टीपांचेही स्वागत आहे.
तळटीप १
"पाच-पाच-पाच" हा या प्रकारचा पहिला उपक्रम होता. विदागाराशी आणि/किंवा सेवादात्याशी संबंधित काही तांत्रिक कारणाने "मनोगत" वरील अनेक चर्चा पुसल्या गेल्या. त्यात "पाच-पाच-पाच" सुद्धा पुसला गेला. आपल्या सर्वांचा उत्साह असेल तर "पाच-पाच-पाच" आपण परत एकदा करू शकतो. कृपया व्य. नि. द्वारे कळवा.

तळटीप २
तसेच, 'मनोगत'वर शोध घेताना आठ-आठ-आठ अस उपक्रम सापडला नाही. असे वाटते कि आपण आठ-आठ-आठ हा उपक्रम करावयास विसरलो आहोत. आपल्या सर्वांचा उत्साह असेल तर "आठ-आठ-आठ" आपण करू शकतो. कृपया व्य. नि. द्वारे कळवा.