अंगात शर्ट की शर्टात अंग?

पुष्कळदा चुकीच्या आणि योग्य शब्दप्रयोगांतील फरकाचे उदाहरण म्हणून "अंगात शर्ट घालण्याऐवजी शर्टात अंग घालणे" असे म्हणावे असे सांगितले जाते. मी तर अगदी लहानपणापासून हे 'गंमत' ह्या सदरात ऐकत आलो आहे. पण आता विचारांती मला 'अंगात शर्ट घालणे' असे बोलण्यात काहीही गैर, अयोग्य, निरर्थक किंवा चुकीचे वाटत नाही.

किंबहुना 'शर्टात अंग घालणे' हे प्रत्यक्षात जरी तसे दिसत असले तरी तो वाक्प्रयोग त्याघटनेचे अर्थवाही वर्णन करण्याच्या बाबतीत पूर्णपणे चुकीचा आहे असे वाटत आहे.


आपली मते ह्यावर नोंदवा, म्हणजे माझेही म्हणणे मी मांडीन.


येथेच खाली माझा युक्तिवाद आहे.