तुझी नि माझी अमर्त्य प्रीती
तरीहि का मन्मनात भीती५?
प्रिया, मला सांग येत हृदयी
पुनःपुन्हा स्पंदने कशी ती? ।ध्रु।
कि कौमुदी ऐकुनी तयाचे ...
लयीत लाटांवरी झुलूनी
फुलून नाचे खुलून नाचे१
चहूकडे प्रीतिची प्रतीती
तरीही का मन्मनात भीती? ।१।
म्हणे मला मन असे घडो की,
कधी न संपून रात्र जावी
सदैव ही मालिका सुखाची
अशीच अविरत सुरू रहावी
बघेन तेथे तुझी प्रचीती२
तरीही का मन्मनात भीती? ।२।
सुखास तारुण्य आज आले
मनास वाटे जणू नभाचे
करांस किंचन्य३ आज आले
विहार ताऱ्यांत पद करीती४
तरीही का मन्मनात भीती? ।३।
टीपाः
१. ह्या ओळीच्या भाषांतरात जरा जास्तच स्वातंत्र्य घेतलेले आहे.
२. येथे 'बघेन तेथे तुझीच प्रचिती' असे करता आले असते पण मग यमकपूर्व स्वराची वाट लागली असती. 'प्रचीती' असे करून ती बिलामत टाळली
३. किंचन्य म्हणजे ताबा किंवा मालकी किंवा स्वामित्व. अर्थ येथे मिळाला. (यमकाचा मोह आवरेना )
४. येथेही टीप २ प्रमाणेच. 'विहार पद तारकांत करिती' असे जास्त बरे वाटले असते... पण तीच ती बिलामत 'करीती' असे करून पुन्हा एकदा टाळली.
५. ह्याऐवजी 'तरी कशी मन्मनात भीती' असेही चालेल पण मग दोन्ही ठिकाणी कशी कशी कसे वाटेल ते पाहावे.... आवडेल ते घ्यावे
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : भाषांतर मूळ गाण्याच्या चालीत नाही. भाषांतराची चाल :
लगालगागा - लगालगागा - लगालगागा - लगालगागा (वृत्त : हिरण्यकेशी)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... ईती असे जमवा बरका. यमकाची जागा ठळक केलेली आहेच. ... आणि हो, ध्रुवपदात यमक तीन ठिकाणी जुळवायचे आहे !