बीजेपीची धुरा वाहती नरेंद्र मोदी!

नुकत्याच जाहीर झालेला गुजरातेतील निवडणुकांचा निकाल अन् मनोगतावरील ही वादग्रस्त गझल यावरुन सुचलेल्या काही प्रासंगिक ओळी. संबंधितांनी (म्हणजे नरेंद्र मोदी, कवि व वाचक यांनी) हलकेच घ्यावे ही विनंती.

विडंबन
निवडणुकीत हे विजयी होती नरेंद्र मोदी!
बीजेपीची धुरा वाहती नरेंद्र मोदी!!

येडीयुरप्पा गेले तेव्हा झाली परीक्षा....
पक्ष फाटू दे, तोही शिवती नरेंद्र मोदी!

अंबानी अन् टाटा मागे उभे राहती!
नॅनोचा संसार वसवती नरेंद्र मोदी!

हवा भाव अन् हवी सबूरी पक्षापाशी;
नवनवीन उद्योग फुलवती नरेंद्र मोदी!

उगा कशाला धावावे मागुनी मतांच्या?
सोनियासही पहा हरवती नरेंद्र मोदी!

मनोगतावर गझलांचे हे रान माजले
वाचकांसही सद्गती देती नरेंद्र मोदी!!

----- वि.* आजानुकर्ण
विडंबन व राजकारण विभाग,
खोडसाळ विद्यापीठ,
केशवसुमार महाविद्यालय पुणे.
फोन नंबर: ४२०८४०

* वि. = विडंबक किंवा विद्यार्थी किंवा दोन्ही