आग भडभडते... काळिज धडधडते

नायिका :
आऽग भडभडते... काळिज धडधडते
दुखणे छळते हे भारी तारुण्याचे वाढते ।ध्रु।

नायक :
आऽग भडभडते... काळिज धडधडते
दुखणे छळते हे भारी तारुण्याचे वाढते ।ध्रु।

नायिका :
गंधित हा वारा ... स्थिरता ना पाया माझ्या
आता तू येउनी ... सावर मज राया माझ्या
पाऽन् फडफडते की ... वीऽज् कडकडते ।१।
दुखणे छळते हे भारी तारुण्याचे वाढते

नायक :
प्रीतीला माझ्या ... बोलवले कोणी?
अठवण कुणाची मज ... ओढून आणी४?
खूऽण् कुणाची  ... हृदयी ही जडते? ।२।
दुखणे छळते हे भारी तारुण्याचे वाढते

नायिका :
दिसता तू गेले ... थाबून  दुखणे
नायक :
तुज मी न आता ... सोडून जाणे
दोघे :
जगणे तुझ्याविण ... आहे अवघड ते ।३।
दुखणे छळते हे भारी तारुण्याचे वाढते

टीपा
४. पर्याय : मूळ गाण्याच्या शब्दशः जवळ जायचे तर
खोरण भडभडते - काळिज धडधडते
असे त्यातल्या त्यात करता आले असते ( खोरण चा अर्थ येथे मिळाला होता... पण तो मोह आवरला शिवाय गाण्यात 'आग'च दिसली )
(भडभडणे चा अर्थ येथे मिळतो)
काही शब्दांचे उच्चार : पाऽन् वीऽज् सोडूऽन् खूऽण् ... असे
१. पर्याय : सावर मज राया माझ्या
२. पर्याय : पाऽन फडफडते... जणू वीजच पडते
३. आठवण असे पटकन म्हणताना अठवण असे म्हटलेले आहे. (अता सारखे! किंवा 'तुम्ही मला अधार' सारखे) नको वाटत असेल तर 'आठव कुणाचा मज .. ' असे म्हणावे.

४. ह्या कडव्यात शेवटच्या दोन ओळींचा क्रम बदललेला आहे

मूळ गाण्यातल्या क्रमाप्रमाणे भाषांतर:

प्रीतीला माझ्या... बोलवले कोणी
हृदयावर माझ्या कुणी... केली निशाणी
अठवण कुणाची... मज येथे ओढते

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

कडव्यातल्या पहिल्या दोन ओळी साधारणपणे गागाल गागा ... गागाल गागा अशा असाव्यात. मात्र ह्या गागाल गागा च्या अलीकडे पलीकडे  जवळ जवळ गागागा इतकी जागा आहे. गीतकार/संगीतकारांनी तिचा उपयोग वेगवेगळ्या ओळीत वेगवेगळा केलेला आहे. म्हणजे कधी

गागाल गागा .. गागाल गागा गागा
तर कधी
गागाल गागागागा ... गागाल गागा 
असे केलेले आहे. शिवाय ह्यातल्या ल लाही कधी कधी गा केलेले आहे. उडती चाल असल्याने गाणे ठसक्यात म्हणता येते.
भाषांतरात मी त्या त्या ओळीएवढीच भाषांतराची ओळ ठेवलेली आहे त्यामुळे मूळ चालीत गाणे नीट म्हणता येते, काळजी नसावी

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे
शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...    डते किंवा ढते   असे जमवा बरका! यमकाची जागा ठळक केलेली आहे.