लग्नाचा विषय.

काही दिवसापुर्वी प्रवास करण्याची संधी आली असतांना प्रवासात एक चौकोनी कूटुंब भेटले. नवरा अदांजे ५० वर्षाचा असावा, बायको (४५), मुलगा (२२/२३) आणि मुलगी ( १८) चे असावेत.


मला ते कूटुंब अतिशय सुखी आणि समाधानी वाटले. भाउ आणि बहिणी मधे काही तरी चेष्टा-मस्करी चालु होती, आई या सर्वाकडे कौतुकमिश्रित स्नेहशील नजरेने पाहत होती. नवर्‍याच्या चेहर्‍यावर कमालीची स्थितप्रज्ञता होती. विशेष म्हणजे सर्व कूटुंब दिसण्यामधे आणि आर्थिक दृष्ट्या सामान्य वाटत होते ( कदाचित माझा हा शेरा काही लोकांना आवडणार नाही.).


माझे असे मत आहे कि, त्या कूटुंबाच्या खरे अधिपत्य त्या स्त्रि कडे असावे आणि सुखी / समाधानी कूटुंब कसे असावे याचा ते आदर्श असावे.
आता माझा मुद्दा असा आहे कि, या गोष्टी लग्नामुळे साध्य होवु शकतात काय?


सुखी कुटुंब होण्यासाठी प्रेमविवाह आवश्यक आहे काय? नवरा-बायकोतील सौंदर्य, आर्थिक बाजू, शिक्षण या संसारातील सुख-समाधानाशी या एकमेकांशी निगडीत आहे काय?


कृपया, तुमचे यावर काही विचार, अनुभव, मत आहे काय?


शेवटी, आपल्या मनासारखी बायको मिळावी असे कोणाला वाटत नाही? पण सध्याच्या काळात हे शक्य आहे काय? असा (गोंधळ ) विचार माझ्या मनात आहे.


लग्नामुळे सर्व सुखी जीवनाचा मार्ग मिळेल या अपेक्षेसह,


हिरामण.