भारनियमन!

प्रेरणा--


 मेघ नसता आणि टग्या.


 


भारनियमन!


रात्र असता वीज नसता दीप उजळू लागले


जाहले इतुकेच होते भारनियमन जाहले!!


वायरींवर टाकलेले चोरटे ते आकडे


वीजचोरांना तुम्ही  रे आधी का नच पाहिले?


एवढा भलताच आहे नियमनाचा काळही


रोजचा स्वयंपाक करणे भार वाटू लागले!!


लाख उपकरणे घराशी मन तरीही हळहळे


काल जे जे घेतले ते आज पडूनी राहिले!!


गोजिऱ्या सासूसुनांच्या साजिऱ्या त्या मालिका


पाहणे मी थांबले अन "हे" हसाया लागले!!


भर पहाटे फॅनची मी दृष्ट काढून टाकली


थांबला जागीच तो मी गरगराया लागले!!