लग्नाची(हवीहवीशी)बेडी

लग्न लग्न म्हणजे नक्की हो काय??
मुहूर्त पाहून बेडीत अडकवलेले पाय..
भटजींनी पाच मिनीटात मंत्र म्हणायचे,
चि. आणि चि‌. सौ. कां. चे permanent welding करायचे..
'श्री' मनी म्हणतात, 'आता विसरा रात्री २ ला घरी येणे'
'सौ' मनी म्हणतात, 'जमेल का नीट स्वयंपाक करणे'
सासूबाई म्हणतात, 'सूनबाई, मला आईच म्हण'..
पण मग 'सौ' तर होणार 'श्री' ची बहीण..
सुरुवातीचे दिवस कित्ती कित्ती गोड..
मधुरच लागते 'ती'ने दिलेली लोणच्याची फ़ोड..
'आमच्याकडे हे चालत नाही'
'आमच्या 'यां'ना ते आवडत नाही'..
आता गप्पांत दुसरा विषयच नाही..
'यां'च्या पेक्षा 'ग्रेट' जगात काहीच नाही..
बघता बघता गेली वर्षे वीस पंचवीस..
'मधुर' लोणच्याच्या फ़ोडीने दिला 'डायाबिटीस'..
पण बेडीची झाली आता इतकी सवय,
कि मुलांना म्हणायचे, 'तुझे आता लग्नाचे वय..'


(ता.क. 'अ-गेयते' बद्दल क्षमस्व!सावधान!कवी शिकत आहे..)