तू जीभ पाघळू दे

तू जीभ पाघळू दे
पाल्हाळ कोसळू दे

बांडी तुझी मुजोरी
(आता मला टळू दे)

मूर्खास मूर्खता ही
कळली कधी कळू दे!

गायी लगीत इथे
मोकाटसा वळू दे

त्या शूर ढेकणाला
शालीनशी जळू दे

प्रेमात सह्य सारे
दे फोड वा गळू दे

झोंबू नकोस वर्षे
मजला भजी तळू दे

दे तू शिव्या सखे पण
हलकेच दे, हळू दे

आला वळू समोरी
'टीक्या' अता पळू दे

    ऋण
  1. पाऊस  कोसळू दे-संदिग्ध
  2. पाऊस
  3. पाऊस कोसळू दे