मनोगत ई-कट्टा

भाष यांनी सुरू केलेल्या अमेरिकन कट्टा - २ मध्ये भोमेकाकांनी मांडलेल्या आणि रोहिणीने उचलून धरलेल्या ई-कट्ट्याचा मुद्दा मलाही खूप पटला आहे. या चर्चाप्रस्तावामार्फत मी भाष, भोमेकाका, रोहिणी आणि माझ्या स्वतःतर्फे ( आम्ही प्रातिनिधिक आहोत ) आपणां सर्व मनोगतींना ( सहकुटुंब सहपरिवार ) या ई-कट्ट्यासाठी आमंत्रित करू इच्छिते. लवकरात लवकर हा कट्टा ठरवूया आणि यशस्वीपणे साजरा करूया. काय मनोगती, काय म्हणता याबद्दल?