प्रयत्नपूर्वक शिकले होते!

प्रयत्नपूर्वक शिवले होते वर आधारित


(जित्याची विडंबनाची खोड.... जाता जात नाही)


कठिण पेपर सोडवताना--


प्रयत्नपूर्वक शिकले होते
पुन्हा विसरले.
डोके फुटले तरी उत्तरा
नाही स्मरले



जाणिवपूर्वक जपली होती
कॉपी आतली.
परीक्षकाने मागुन पण ती
हाक मारली.


मी ना तसली किती सांगण्या
प्रयत्न केला.
ओली हळवी नजर पाहुनि
तोही फसला.