सोपे (!?!?) गणित

(घुसळलेले लोणी - २७)


आज अगदी ब्राह्ममुहूर्तावर मनोगतावर वावरताना आठवलेले गणितातले हे एक इटुकले - पिटुकले उदाहरण!


६४/१६ = ४/१ = ४


६५/२६ = ५/२ = २.५


९८/४९ = ८/४ = ८/४ = २


आहे की नाही अगदी सोयीचे आणि सोपे गणित!! फार फुलोरा अथवा घमघमाट नसला तरी त्याची स्वतःचीच एक ऐट आहे... ...


असो... या प्रकारच्या संख्यांना काही एक विशेष नाम आहे... याक्षणी मला आठवत नाही... तसेच "अशी" सोपी गणिते किती असू शकतात यावर गणितींनी श्रमही घेतलेले आहेत.
(तुम्हीही या धडपडीत जरूर सामील व्हा!!)


ही आणि अशी अनेकानेक "सौंदर्यस्थळे" गणितात जागोजागी आहेत. नंबर थेअरी हा विभाग तर जणू अशा सौंदर्यस्थळांचे रसग्रहण/आस्वाद घेणे चालू असते...
या शास्त्राचा/विभागाचा उपयोग काय असे म्हणाल तर मला सांगता नक्कीच येईल... पण नकोच... त्याऐवजी थोरामोठ्यांची ही उद्धरणे आठवली ती पुरवतो -



  • Mathematics is the queen of the sciences and number theory is the queen of mathematics.
  • नंबर थेअरी इज अ क़्वीन ऑफ़ मॅथेमॅटिक्स... ऍन्ड शी डज् नॉट मेक हर हॅन्ड्स् डर्टी विथ ऍप्लिकेशन्स
  • लोग पूछते है इश्कसे क्या फायदा... मैं पूछता हूं फायदेसे क्या फायदा