होमिओपथी

     (या विषयावर चर्चा झाली की नाही माहीत नाही शोधामध्ये काही दिसले नाही म्हणून प्रस्ताव मांडत आहे.)
  मध्यंतरी होमिओपथी हे थोतांड आहे अशा स्वरूपाची माहिती वाचण्यात आली ̮ . लान्सेटचेच ते मत आहे असे छापून आले होते.तरीही आपल्याकडे बी. एच्. एम् .एस् . पदवीधारकास कायदेशीर डॉक्टर म्हणून मान्यता आहे. बरेच रोगी त्यांच्या उपचारानी बरे झाल्याचे मान्य करतात. होमिओपथीची औषधे निर्माण करण्याची कृती वाचून या औषधानी कसलाच परिणाम होणे शक्य नाही असा ग्रह होतो. बरे होणारे रुग्ण प्लेसिबो (मानसिक) परिणामाने बरे झालेत असे मत आहे. काही डॉक्टर तर एम्.बी.बी.एस्. पदवी असताना होमिओपथीची प्रॅक्टिस करतात आणि ती उत्तम चालते. या बाबतीत मनोगतींचे मत आणि अनुभव काय आहे?