पत्ते खेळूया?

एकाने घरून येताना पत्त्यांचा कॅट आणला. आम्ही "खेळूया! खेळूया!!" असे म्हणत मस्तपैकी सतरंजी घालून बसलो. लहानपणीच्या आठवणी जागवत ३०४ खेळायचे असे ठरले. पण कसे काय खेळायचे कुणालाच नीट आठवेना. गोटू, नव्वी, एक्का अशी उतरंड आठवते आहे. पण खेळाचे नियम आठवत नाहीत. शेवटी, झब्बू, चॅलेंज वगैरे खेळून वेळ मारून नेली.


३०४ आणि लॅडिसचे नियम, खेळायची पद्धत कोणी सांगेल का?