काय करावे आपल्या चमुला ?

९१ धावांत संपूर्ण संघ बाद !
त्यातल्या ३५ धावा सचिनच्या !
बाकी सगळे कागदी शेर...... ढेर !
काय करावे आता ह्या चमूला ? कोणाची चूक आहे ?
संघव्यवस्थापनाची की ग्रेग चॅपेलची ?
सचिनची की राहुलची ?
सेहवागची की हरभजनची ?
कोण जबाबदारी घेईल आपल्या संघाच्या पतनाची ?
ग्रेग चॅपेल ?
मी सौरभ गांगुलीला भरभरून नांवे ठेवली !
चूक माझीच होती........
कसे कळले नाही तो एकटाच शर्ट काढू शकतो ह्या सगळ्यांच्यात?
कसे कळले नाही तो एकटाच नाणेफेकीसाठी आपल्या मर्जीने येऊ शकतो ?
कसे नाही कळले तो एकटाच जिंकू किंवा मरू ह्या जिद्दीने खेळतो ?
माझ्या एकट्या सचिनच्या भरवशावर किती दिवस मी बसावे ?
हा सामना पाहावा की आपल्या कामाला लागावे?
काय करू ?
सुचेना......
तुम्हीच सुचवा......... आता उपाय सर्व हरलोय,
                ह्या सामन्यात उरली सुरली इब्रतही हरलोय......

एक क्रिकेट व भारत वेडा