खिद्रापुर

नुकताच कोल्हापूर, खिद्रापुर, अंबोली, गोवा असा प्रवास केला त्याची बरीचशी प्रकाशचित्रे इथे आहेत.


खिद्रापुर हे कोल्हापूर पासुन ६० की. शिरोळ तालुक्यात आहे. तेथील कोपेश्वराचे मंदिर हे तिथल्या नृत्यशिल्पांसाठी जरुर पहाण्यासारखं आहे. कोल्हापूर वरुन खिद्रापुरला जायचं व येतांना नरसोबाची वाडी, कुभोज येथील बाहुबलीचं मंदिर करुन कोल्हापूरात मुक्कामाला यायचं.

शुद्धिचिकित्सकात सुधारणा करता येईल का?

शुद्धिचिकित्सकाकडे दिलेली माहिती तपासून येण्यापूर्वी (शुद्धिचिकित्सकाशी संधान सुरू असताना), वेळ दाखविली जाते. ही वेळ 11:9:2 (११ वाजून ९ मि आणि २ से) अशी दिसते. वास्तविक ही वेळ 11:09:02 अशी असावी.
दुसरे असे की ही वेळ देवनागरी लिपीत दाखवता आली  (११.०९.०२) तर फारच उत्तम. (अर्थात हे तांत्रिकदृष्ट्या कठिण असेल तेंव्हाच आतापर्यंत केले नसणार याची जाणीव आहे. पण मनोगतावर या विषयाचेही बरेच जाणकार आहेत, तेंव्हा यावर विचार करता येऊ शकतो)

विचित्र विश्लेषण

म.टा. मधील ही बातमी वाचलीत का? लेखकाने हा लेख जर उपरोधिकपणे लिहिला असेल तर ठीक आहे. पण जर गंभीरपणे लिहिला असेल तर मात्र खरेच अवघड आहे. हे म्हणजे "दरोडेखोर आहे, लूट मार करणे त्याचे कामच आहे. आता लुटताना एखाद्याचा जीव गेला तर त्यात त्याचा काय दोष.

शेलारमामा, एकश्लोकी महाभारत आणि इतर चौकश्या

नमस्कार,


दोन चौकश्या -



  • सिंहगडाच्या लढाईतील शेलारमामा आपणां सर्वांना माहित आहेत. त्यांचे नाव काय होते कोणी सांगू शकेल का?

  • एकश्लोकी रामायण, एकश्लोकी भागवत बऱ्यापैकी लक्षात असते. पण एकश्लोकी महाभारत कोणाला आठवत आहे का?