यूबंटू मधील फाँट प्रॉब्लेम

मी नुकतेच युबंटू वर 'इंडिक' फाँट बसवले पण ते नीट दिसत नाहीत. हिंदी हा शब्द "हनिद.."असा दिसतो. (युबंटू चे व्हर्झन ५.०२). गुगल वर चौकशी केली पण उपयोगी माहिती मिळाली नाही. कुणी यावर प्रकाश टाकून मला मदत करू शकेल काय ?

आपला मदतेच्छू

मनोगत इ संमेलन १७ जून २००६

संगणक सुरू करताच वेदश्री व संदीप यांनी माझे स्वागत केले. "नमस्कार रोहिणी"


"नमस्कार संदीप , वेदश्री" "तुम्ही कुठे असता संदीप?" मी. "मी पुण्यात पण सध्या चीनला आहे" संदीप


"येथे आज इ संमेलन आहे ना?" सुभाष, "हो हो. या सुभाषराव! आपले स्वागत आहे" मी, वेदश्री, संदीप.

इंग्लंड्चा बकवास खेळ

(मेघदुत नी सुरु केलेल्या मालिकेवरुन प्रेरीत होउन आणि इग्लंडचा सपोर्टर असल्यामुळे आजच्या त्यांच्या स्विडन विरुद्धच्या सामन्यानंतर मलाही त्या सामन्याबद्द्ल माझे मत मांडावेसे वाटले.)


आत्ताच इंग्लंडचा स्वीडन विरुद्धचा सामना पाहीला. जे कोल आणि गेरार्ड चे दोन गोल सोडले तर एकंदरीत इंग्लंड अगदीच सुमार खेळले. पुढच्या फ़ेरीत जाताना त्यांच्या खेळाचा दर्जा उंचवायला हवा होता पण तसे काही दिसले नाही. खेळाच्या १ल्याच मिनीटात दुखापतींचा नेहमीचा गिऱ्हाईक ओवेन गुडघा मोडून आडवा झाला आणि तिथेच पाल चुकचुकली. ज्या रूनी-ओवेन जोडगोळीबद्द्ल इतके बोलले गेले ती पहिल्या मिनीटातच संपली. ओवेनच्या जागी पीटर क्राउच ला आणले. तो जरी चांगला खेळत असला तरी त्याच्या डोक्यावर आधीच एक पिवळे कार्ड आहे आणि अजुन एक कार्ड त्याला पुढील सामन्यात खेळू देणार नव्हते. (तीच कथा गेरार्ड ची पण होती त्यामुळे आज त्यां दोघांना ह्या सामन्यात उतरवणार नव्हते पण अखेर ह्या दोघांना मॅदानात उतरावे लागले. इग्लंडचे नशीब चांगले की हे दोघे आज सही सलामत सुटले.)

भरलेले बटाटे

वाढणी
कितीहि करा..कमीच पडतात

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • ५-६ छोटे बटाटे - दम आलू वगैरेला वापरतात तसे
  • अर्धी वाटी मक्याचे दाणे उकडून
  • अर्धी वाटी मटाराचे दाणे उकडून
  • १ हिरवी मिरची, १/४ इंच आलं, १ पाकळी लसूण
  • अर्धी वाटी पेपर जॅक चीज किसून
  • चिमुट्भर गरम मसाला, १/२ चमचा लिंबाचा रस

मार्गदर्शन

- बटाटे उकडून, सोलून बाजूला ठेवावे

- बटाटे अंडा करीला अंडी चिरतो तसे अर्धे चिरावे

मनोगत बंद आहे

मनोगत बंद असणे, उघडताना वेळ लागणे, मधून मधून जाब द्यावा लागणे ह्याचा एक चांगला परिणाम म्हणजे आपोआप तुमचे मनोगताचे लागलेले व्यसन सुटेल.


दर अर्ध्या तासाने क ने कुठले प्रवास वर्णन लिहिले, ट ची "प" च्या कवितेवर काय टीका झाली,  मला कोणी व्य. नि. पाठविला आहे का? अशा रितीने मनोगतावर पडीक आता कमी होतील.

टर्मिनेटर सीड (भाग - १)

सकाळचे सात सव्वासात वाजले होते.  सतीशनं खोलीचं लॅच काढलं आणि दरवाजा ढकलून उघडला.  खोली छोटीशीच होती पण नुकतीच कुणीतरी झाडून पुसून अगदी स्वच्छ करून ठेवली होती.  सतीशनं बॅगा आत घेतल्या.  एक कपड्यांची आणि दुसरी पुस्तकांची.  रात्रभरच्या प्रवासानं त्याचं अंग पार आंबून गेलं होतं.  दार बंद करून सतीशनं कॉटवर तसंच अंग टाकलं आणि नकळत त्याचा डोळा लागला. 

महाराष्ट्र टाईम्सने तोडले मनोगतावरचे तारे

महाराष्ट्र टाईम्स मध्ये "हसा लेको" सदराच्या ह्या भागामध्ये मामंजींनी मनोगतावर मनोगतींनी "तोडलेले तारेच" चक्क चमकवले आहेत. अर्थातच मनोगताच्या संदर्भाशिवाय, जो देणे माझ्यामते सहज शक्य आहे. आता ह्याला काय म्हणायचे?