बंद पडणार्‍या मराठी शाळा.

आजच नागपुरच्या दै. नवराष्ट्र मधे बातमी आली कि, महानगर पालीका चालवत असलेल्या २७ मराठी शाळा विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी बंद करण्यात आल्या आहे. २ वर्षापुर्वी मुंबई मधे जवळ जवळ २५००००० मराठी शाळैय मुलांची संख्या प्रत्येक वर्षी घटत आहे.  बाकी इतर ठिकाणची जी काय स्थिती असेल ती वेगळीच.

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं

प्रिय प्रकाशक यांसी,


या संकेत स्थळावर प्रत्येक पानाच्या खाली (footer), 'मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं' आसं लिहिलं आहे. वाचताना नेहमी गोंधळ होतो.


'मराठी माती'  आणि 'मराठी मती ' हे दोन वेगळे शब्द आवरजुन लिहिले आहेत का? आणि 'माणसं' व 'मानसं' यात नक्की बरोबर कोणतं आहे.

राजशिष्टाचार : प्रमोद नवलकर (म.टा.)

श्री प्रमोद नवलकर पूर्वी प्रोटोकॉल मंत्री होते. त्यांनी म. टा. मध्ये लिहिलेला एक अतिशय खुसखुशीत लेख. मराठीतून आस्वाद घेता यावा ह्या उद्देशाने येथे उतरवून ठेवला आहे.

राजशिष्टाचार
ले. प्रमोद नवलकर
महाराष्ट्र टाईम्समधील मूळ लेख येथे आहे. : राजशिष्टाचार
[ , १६, ऑग. २००४ सायं ०४:५३:०५ ]

मराठी अदभुत कथा

नुकतेच द्वारकानाथांचे मराठी अदभुतरम्य कादंबर्‍यांबद्दलचे पोस्ट वाचले. या प्रकारच्या कादंबर्‍या मराठीत गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झालेल्या नाहीत हे खरे, पण मराठी अदभुत/गूढ कथालेखकांमध्ये नारायण धारप, रत्नाकर मतकरी, आणि जुन्या लेखकांमधले द. पा. खांबेटे यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. धारपांचे गूढकथा, भयकथा, विज्ञानकथा संग्रह, त्यांच्या समर्थकथा अतिशय वाचनीय आहेत. त्यांचे १-२ वर्षांपूर्वी आलेले 'चेटकीण' हे पुस्तक मी गेल्या काही वर्षात वाचलेल्या उत्तम गूढ कादंबर्‍यांपैकी एक आहे. 

शायरी वा वा...

मराठीमधील आद्य शायर श्री वा वा उपाख्य भाऊसाहेब पाटणकर यांच्या आपणांस आवडलेल्या ओळी येथे लिहा.



खेळलो इष्कात सार्‍या, बेधुंद आम्ही खेळलो.
लोळलो मस्तीत, नाही पायी कुणच्या लोळलो.
अस्मिता इष्कात सार्‍या, के

नृत्यसमारंभाबद्दल एक परखड लेख

अलीकडे प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठाकांक्षी लोकांच्या चालीरीतींबद्दल इतके परखड लेखन झालेले वाचले नव्हते. त्यांना समजून घेण्याची किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षकरण्याचीच रीत आहे की काय असे वाटत असताना हा लेख वाचनात आला. तुम्हीही वाचा आणि प्रतिक्रिया लिहा.

पैशाचे सोंग

........पैशाचे सोंग आणता येत नाही असे आपण म्हणतो. म्हणजे काय? तर जेंव्हा पैश्यांची गरज पडेल तेंव्हा अचानक पैसे उभे करता येणार नाही. असे फक्त आपणच म्हणतो, की महाराष्ट्राबाहेरही हा समज आहे? पैश्याकडे पैसा जातो म्हणतात. किंवा बँकाही मुळात पैसे असलेल्यालाच आणखे पैसे उसने देतात. असे का होते? मराठी माणूस पैश्याच्या बाबतीत इतका मागे का? असा विचार मनात आला असताना, हा म टा मधला लेख वाचला.

अदभुत रम्य कथेचे दालन.

मराठी भाषेतील दालनात अद्भुतरम्य कथांचे एक आगळे आणि वेगळे असे अस्तित्व आणि महत्व ठरलेले आहे. हे दालन ह. ना. आपटे, गों.ना.दातार, नाथमाधव  आणि शशी भागवत याच्यां सारख्या प्रतिभासपंन्न सारस्वतानी मनापासुन सजविलेले आहे.


अद्भुतरम्य कथांचे हे दालन मधासारखे अविट आहे. अविट, मधुर, गोड-गोड आणि हवेहवेसे वाटणारे. प्रसंगी औषध म्हणुन वापरतायेण्यायोग्य. या कथांचे अनेकाविध वैशिष्टे मराठी वाचकांना नेहमीच भुरळ टाकत आलेले आहे.