बंद पडणार्‍या मराठी शाळा.

आजच नागपुरच्या दै. नवराष्ट्र मधे बातमी आली कि, महानगर पालीका चालवत असलेल्या २७ मराठी शाळा विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी बंद करण्यात आल्या आहे. २ वर्षापुर्वी मुंबई मधे जवळ जवळ २५००००० मराठी शाळैय मुलांची संख्या प्रत्येक वर्षी घटत आहे.  बाकी इतर ठिकाणची जी काय स्थिती असेल ती वेगळीच.


अशा परिस्थिती मधे मी काय करावे असे तुम्हाला वाटते. जेणे करुन या परिथितीमधे काहीतरी सुधारणा होवु शकेल.


१. मी आठवड्यामधे किमान ४ तास या साठी देवु शकेल.


२. येथील स्थानिक वर्तमानपत्रात थोड्याफार ओळखी आहेत. काही लेख, बातम्या, वगैरे प्रसिध्द करुन आणु शकतो.


३. कोणत्याही कामाची लाज नाही. प्रसंगी रस्त्यावर उभा राहुन प्रचार पण करु शकतो.


कृपया आपल्या सुचना कळवाव्या, कि जेणेकरुन मी माझे कर्तव्य पार पाडू शकतो.


आता हातावर हात ठेवुन बसण्याची वेळ नाही, हे खरे.  


द्वारकानाथ.