कुठे शोधिशी...
इतर संकेतस्थळे आणि हे ह्यात एक महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे, इथे केवळ विषय उपविषय असे वर्गीकरण करून आम्ही थांबलेलो नाही. इथली वर्गीकरणपद्धती अधिक लवचिक आहे. इथे लेखांच्या वर्गीकरणासाठी वेगवेगळी वर्गीकरण सूत्रे एकाच वेळी वापरलेली आहेत. सोपे उदाहरणच घ्यायचे तर 'कलामहाविद्यालयात संगणकाचा प्रभाव' ह्यासंदर्भात एखादा लेख असेल तर तो वाचकास शिक्षण, कला, संगणक तंत्रविज्ञान असे निरनिराळे 'विषय' आणि अनुभव, माहिती, शंका, मदत, सल्ला असे निरनिराळे 'लेखनप्रकार' ह्या दोन्हीतील अनेक उपसदरात एकाच वेळी सापडायला हवा! तशी व्यवस्था एकापेक्षा अधिक वर्गीकरण सूत्रे वापरून करता येते.