ही वेबसाईट लिनक्सवर:

सध्या लिनक्स माध्यमातून बरेच काम होत असते.


उद्या लिनक्स मराठीमधून उपलब्ध झाल्यास ही वेबसाईट


त्या ओ.एस. वरही अशीच सुंदर दिसेल का?


कळावे...


रागलोभी.

शेलापागोटे

महाविद्यालयात असताना नाटके, नृत्य, गीते, मिमीक्री शो,पारितोषिके यांची रेलचेल असणारे स्नेहसंमेलन हे सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक आकर्षण असते , होय कि नाही ? त्यातल्या त्यात शेलापागोटे हाही एक महत्त्वाचा भाग असतो. आपण सर्वांनी तो महाविद्यालयीन जीवनात अनुभवला असणार याबद्दल माझी खात्री आहे. तेव्हा असेच काही तुम्हाला माहिती असलेले विनोदी, मजेशीर, विरंगुळा देणारे शेलापागोटे लिहुयात का इथे ? पण त्यात कुणाच्याही (म्हणजे मनोगतींच्या, अन्य कुणाचा चालेल... अर्थात नट, नटी वगैरे वगैरे) नावाचा उल्लेख नसावा. सर्व मनोगती यात सक्रीय भाग घेतील अशी मला खात्री आहे. जे घेणार नाहीत त्यांच्यासाठी हा पहिला शेलापागोटा ...
'ओंडक्यावर ओंडके, शंभर ओंडके,
जे शेलापागोटे लिहिणार/सांगणार नाहीत, ते दादा कोंडके'  

सेलफोनचा सह-वास!

(टीप : ह्या गोष्टीतील सर्व पात्रे, प्रसंग, ठिकाणे, वस्तू, विचार, तत्त्वज्ञान इत्यादी सर्वकाही पूर्णपणे काल्पनिक आहे. कशाचेही कशाशीही काहीही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा, ही विनंती.)


आनूज आणि हर्शीला (हो, त्यांची नांवे अशीच आहेत.) नुकतेच लग्न होऊन अमेरिकेत आले, तेंव्हा त्यांच्याकडे सेलफोन नव्हते. ते सुरवातीला आणखी एका देशबांधव कुटुंबाबरोबर बाहेर जात असत. कधी ह्यांच्या तर कधी त्यांच्या गाडीतून. असेच एकदा ग्रोसरी आणायला गेले असताना, सासऱ्यांच्या पुजेला फुले लागतात म्हणून त्या कुटुंबातली ती फुलांचा गुच्छ उचलणार तोच मोबाईल वर तिच्या नवऱ्याचा मेसेज आला. इकडच्या फुलांचा भाव विचारून तो देशबांधव म्हणाला, "ते नको. त्यापेक्षा, इथेबागेच्या सामानात फुले असलेल्या कुंड्या आहेत. डर्ट चीप पडेल!"

विचार की माध्यम

नमस्कार


व्ययसायानिमित्त परप्रान्तात स्थायिक झालेल्या पालकाना मुलाना भारतीय पौराणिक कथा , ईसापनिती , रामायण, महाभारत या गोष्टी


व त्यातील  सार  कसे उत्तम्ररित्या सान्गता येईल? मुले शाळेत गेली भाषा की मूळ विचार मनावर कसे  ठसतील याला मह्त्व द्यावे?भारतीय सन्स्कार महत्तवाचे आहेत असे नक्की वाटते.