येथे कुणी यावे? कसे यावे?

हे सार्वजनिक चर्चेचे, विचारांच्या देवाणघेवाणीचे ठिकाण आहे. 


आपण येथे एक एकट्याने न येता समूहाने ग्रुपने ठरवून सदस्य झालो तर इथल्या अनेक सुविधांचा उपयोग आपल्याला आपापसात गप्पा मारायला किंवा व्यक्तिगत निरोप पाठवायला करता येईल.


मित्रमंडळींनी ठरवून या असे सांगायचे कारण की, आपल्या मनातील विचार सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करण्याची आपल्याला सवय नसते. सामान्यपणे आपण सामान्यतः आपले स्नेही, मित्रमंडळी, आप्तस्वकीय, ओळखीचे,  परिचयाचे, आणि अगदीच परके असले तर निदान समविचारी अश्या लोकांशीच बोलाचाल करतो हे मी पाहिलेले आहे. त्रयस्थ माणसाला शंका विचारणे, त्याच्या शंकांना आवर्जून उत्तरे देणे, स्वतःविषयी, आपल्या विचारांविषयी इतरांना परिचित करण्याच्या फंदात आपण सहसा पडत नाही.


तेंव्हा इथे आपण अनेक जण मिळून येऊ लागलो तर दोन्हीचा फायदा (मित्र आणि इतरेजन अश्या दोघांशीही निःसंकोचपणे विचारांची मराठीतून देवाणघेवाण) आपल्याला शक्य होईल असे वाटते.