कॅरॅक्टर एनकोडींग बद्दल माहिती

'कॅरॅक्टर एनकोडींग' बद्दल आधी माहिती दिल्यास यूनिकोड म्हणजे काय हे समजावणे सोपे जाते.


कॅरॅक्टर एनकोडींगबद्दल मी विकीपीडिया.ऑर्ग साईटवर एक लहानसा लेख लिहिला आहे. मूळ साईटचा पत्ता आहे : http://mr.wikipedia.org/wiki/CharacterEncoding

कट्ट्यावरच्या गप्पा....

डिसेंबरचा महिना, कडाक्याची थंडी, नुकताच बंबातल्या गरम-गरम पाण्याने आंघोळ केलेला मराठी इयत्ता चौथीतला मी. काय मजा होती म्हणून सांगू यार...! सकाळी ६ वाजता आम्हाला सहलीला (पिकनिक नाही) घेऊन जायला शाळेच्या आवारात बस येणार होती. मी रात्री गादीखाली घडी करून ठेवलेला शाळेचा गणवेष बाहेर काढला. 'काय मस्त इस्त्री झाली आहे', मनातला विचार गुदगुल्या करीत होता. आईने पहाटे उठून बटाट्याची पिवळी भाजी (सहल स्पेशल) आणि खार्‍या पुर्‍या केल्या होत्या. सर्व जामानिमा करून, डबा घेऊन मी माझ्या मित्राकडे पोहोचलो. आम्ही दोघेही शाळेकडे निघालो. बोचर्‍या थंडीत पितळेच्या डब्याची उब (त्या काळी 'स्टेनलेस स्टीलचा डबा' ही चैन परवडणारी नव्हती.) मन उल्हासीत करीत होती.............

क्षणभर विश्रांती

आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, प्रत्येक माणूस हा घड्याळाच्या काट्यांमागे धावत असतो. सकाळी लवकर उठा, लोकल पकडा... ऑफिसला जा... तिथे कामाचा ताण, स्पर्धेमुळे कामे पटापट आवरणे जरुरीचे असते. सुट्टीच्या दिवशी इतर घरची कामे असतात...


या सगळ्यामधुन आपण दमुन जातो आणि कधीतरी ठरवतो की आता एखादा दिवस विश्रांती घ्यावी... प्रत्येकाची विश्रांती घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. योग्य पद्धतीने विश्रांती घेतल्यास आपण थोड्याच वेळात ताजेतवाने होऊ शकतो...

बिचारी सीता...

परवा कधीतरी चर्चेत रामायणाचा विषय निघाला. एकामागोमाग एक मतं प्रदर्शित केली जाऊ लागली. मग सीतेचं रामा बरोबर वनवासात जाणं, तीची अग्निपरीक्षा, नंतर धोब्याचं ऐकून(लोकापवादास्तव) रामाचं सीतेला पुन्हा वनवासात सोडणं यावर चर्चेतील मुलांनी धडाडीनं मतं मांडली की हे कसं चुकीचं आहे आणि शेवटी "बिचारी सीता" म्हणून मोकळी झालीत...

असामान्य व्यक्तींची रेखाचित्रे!


हे रेखाचित्र,


डॉ. होर्मसजी जहांगीर भाभा ह्या प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञाने काढलेले


श्रीमान मक्बूल फिदा हुसेन यांचे रेखाचित्र आहे.


आपण हुसेन ह्यांना ओळखतच असाल!


हो. ज्यांनी माधुरीवर गजगामिनी सिनेमा काढला,
तेच ते थोर चित्रकार.