श्री रामदास स्वामी, -- ज्ञानदानाचे व्रत मोठ्या निष्ठेने पूर्णत्वास नेत होते. समर्थांनी स्वतः लहान वयातच सन्यासी धर्म स्वीकारला होता. घर, संसार, धन, संपत्ती, सगेसोयरे या सर्वांचा त्याग केलेला होता. लोकवस्तीपासून दूर -- डोंगर, दरी, जंगल आणि त्यातील गुहा, हीच त्यांची आश्रयाची/वास्तव्याची ठिकाणे होती. वैराग्यवृत्ती, संन्यासीधर्म, आणि श्रीराम भक्ती ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्याचप्रमाणे स्पष्टवक्तेपणा ही प्रकर्षाने दिसत, जाणवत असे. कडू औषधाची मात्रा, शर्करावगुंठीत करून देणे नव्हते.