श्री समर्थ रामदास स्वामीं चे समाजप्रबोधनाचे कार्य अहर्निश सुरू होते. जनलोकांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म दुःख, वेदना आणि अडचणींबद्दल समर्थ विचार करीत होते. स्वतःचे ज्ञान, अनुभव आणि बुद्धी यांचा वापर करून त्यावर उपाययोजना शोधत होते. सर्वांना समजेल, कळेल अशा भाषेत उपदेशही करीत होते.
चपळपण मनाचे मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ।
घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनी करूणा हे बोलतों दीनवाचा ॥