(नदीम-) श्रवणभक्ती

आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे.

... अर्थात त्याचा 'फार काही न' अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल असं आमच्या ज्येष्ठ बंधूंचं मत आहे!

साधी गोष्ट आहे. आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा;  अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.)

मराठी पॉपकॉर्न आता राणीच्या राज्यात !!!

नमस्कार मराठी मित्रांनो,
गेल्या चार पाच वर्षांपासून 'मनोगत' ची नियमित वाचक आहे पण आज इथे लिहिण्या चा योग आला आहे. त्याला कारण हि तसेच आहे. नि:संदेह 'मनोगत' चा आवाका खूपच प्रचंड आहे. कारण आमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना या सारखे दुसरे व्यासपीठ नसावे. इथं मिळणारी माहिती नक्कीच आणि नेहमीच  खूप उपयोगी पडते.

डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार २०१६

ज्येष्ठ  समीक्षक व व्यासंगी  प्राध्यापक  डॉ. विलास खोले  यांना
यंदाचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार
 डॉ.   सदानंद मोरे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

बुधवार, १७ ऑगस्ट २०१६, सायं ६:३० वाजता
म. सा. प. चे माधवराव पटवर्धन सभागृह.

चिंता करी जो विश्वाची ... (१२)

श्री समर्थ रामदास स्वामी  श्रीरामाचे परम भक्त होते. संन्यासाश्रम पत्करून, भिक्षांदेही करीत ते आपले जीवन व्यतीत करीत होते. माया आणि मोहपाश त्यांना बद्ध करू शकत  नव्हते. परंतु असे असले तरी समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचे त्यांना कधी विस्मरण नव्हते. समर्थ त्यांच्या   शिष्यांना आणि श्रोत्यांना,  सदैव  श्रीराम भक्तीची महती सांगत असत. संसाराच्या  व्याप-तापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी भगवान श्रीरामास शरण जाणे हाच एकमेव योग्य मार्ग आहे, असे ते सांगत असत.