किल्ला - एक नितांतसुंदर अनुभव

गेले दोन तीन महिने मराठी चित्रपट बघण्याचे माझे प्रमाण चिंताजनक होते. आणि त्यात वाट्याला बहुतांश गदळ आल्याने मनस्ताप साहजिक होता. 'संदूक' पाहिल्यावर तर प्रेक्षक म्हणून मराठी चित्रपटसंन्यास घ्यावा अशी तीव्र इच्छा झाली. पण ती इच्छा पूर्णांशाने प्रत्यक्षात उतरण्याआधीच 'किल्ला' पाहिला नि कृतकृत्य झालो.
अर्थात असेही असण्याची शक्यता आहे की आधीच्या चित्रपटांनी जो ऊतमात केलेला होता त्याच्या तुलनेमुळे हा चित्रपट जास्तीच भावला. पण तसे असले तरी या चित्रपटात मुळापासून वेगळे असे काहीतरी आहे हे निश्चित.

संदूक - साष्टांग नमस्कार

'संदूक' ही चित्रपटांच्या परिभाषेत एक 'पीरियड फिल्म' आहे. पण 'पीरियड' हे फिल्मचे विशेषण आहे. मुळात फिल्म चांगली असेल तरच विशेषणांकडे लक्ष देता येते. हा घोळ सगळीकडेच दिसून येतो. 'शेतकऱ्यांवरची कविता' म्हणून ती चांगली कविता. 'स्त्रियांच्या समस्यांबद्दलचे नाटक' म्हणून ते चांगले नाटक. 'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दलचा लेख' म्हणून तो चांगला लेख. असो.
तर ही स्वातंत्र्यपूर्व कालातली फिल्म. म्हणजे काय, तर वेषभूषा, केशभूषा आदी त्या काळातले वाटण्यासारखे आहे.
एक कोकणातले खेडे. नाव? संबळगड.

शाळेतल्या कविता- वरदा वैद्यांच्या आवाजात

मनोगती वरदा या सध्या फार व्यग्र असल्याने त्यांना मनोगतावर हा प्रस्ताव लिहिण्यास वेळ नाही, म्हणून त्यांच्या परवानगीने मी हे काम करत आहे.
मनोगती वरदा (वरदा वैद्य) यांनी फेसबुकावर शाळेत शिकलेल्या कविता या विषयावर चर्चा सुरू केली होती. पुढे त्यांनी स्वतःच्या आवाजात काही कविता ध्वनिमुद्रित केल्या. त्या ऐकणे म्हणजे एक विलक्षण सुंदर अनुभव आहे.  त्या कविता इथे जरूर ऐका.

अ पेइंग घोस्ट - सुकाणू हरवलेली गळकी होडी

व पु काळे.
शहरी (म्हणजे मुंबई आणि काही प्रमाणात पुणे) वातावरणात वाढलेल्या दोनेक पिढ्या या साहित्य-पिझ्झावरती जगल्या. पहिल्या पिढीवरचा प्रभाव संपतासंपता कथाकथनाच्या कॅसेटसचे प्रस्थ बोकाळले आणि दुसरी पिढीही त्यात गारद झाली.
मी त्यांघे कथाकथन ऐकले ते चाळीस वर्षांपूर्वी खानदेशातल्या एका तालुक्याच्या ठिकाणी. कथाकथन आवडले पण माडगूळकर-पाटील-मिरासदार यांच्या कथाकथनासारखे हे मातीतून उगवलेले कथाकथन नव्हे हेही जाणवले. गुऱ्हाळात शिरून फूफू करीत निववून खाल्लेला गूळ आणि वाण्याच्या दुकानातून वृत्तपत्राच्या कागदाच्या पुडीत बांधून आणलेला गूळ असा तो फरक.