जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील
मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रँड आहे. होय हा ब्रँड आहे
असे मी म्हणतोय कारण मी हॉटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन
पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख,
ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले
नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे
लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे महंमद
मुस्लिम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हिड ख्रिश्चन मी अजून पाहिले
नाहीत.