नातं - भाग २

नातं - भाग २

प्रत्येक व्यक्तिची साधारणतः किंवा प्रामुख्याने चार प्रकारची आयुष्यं असतात. वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, सामाजिक आयुष्य आणि व्यावहारिक किंवा व्यावसायिक आयुष्य. या चार निरनिराळ्या आयुष्यातील प्रत्येक नातं म्हणजेच चार वेगवेगळ्या प्रकारची नाती.

नातं - भाग १

नातं
कुण्या एका गावाच्या वेशीवर एक कुटुंब
छोट्याश्या घरात राहत असतं. आईवडील आणि त्यांची चार मुलं. आईवडील
वेशीबाहेरच्या जंगलात जाऊन वनौषधी गोळा करून गावातल्या एका वैद्याला विकत
असत. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून घर चालत असे. दोन वेळेचं जेवण कसंबसं भागत
होतं. वडिलांकडे वंशपरंपरागत आलेलं वनौषधी आणि आयुर्वेदाचं ज्ञान त्यांना
जंगलात वनस्पती निवडण्यात कामी येत होतं. आईचं काम होतं त्यांना मदत करणं
आणि चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणं. कित्येक वर्षं हे नित्यनियमाने सुरू
होतं.

त्रास

त्रास
२५ माळ्यांची इमारत. आठवड्यासाठी या इमारतीमधील लिफ्ट बंद. कारण नवीन लिफ्ट बसवण्याचा निर्णय सोसायटीने घेतलेला आहे. बरं, पर्यायी लिफ्ट किंवा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे सगळ्या फ्लॅटधारकांची, आठवड्यापुरती का होईना गैरसोय होणार आहे.

दांभिक लोक ओळखण्याचे सात निकष:

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकषः

१) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते.

२) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते.

3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत

त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात.

४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात. आणि जर इतरांसारखे होकारात्मक परिणाम जाणवले नाहीत

तर त्या लोकांच्या आयुष्यांवर टीका करून मोकळे होतात.

शिक्षण

लहानपणी त्यांचा मुलगा काही केल्या शाळेत जायला तयार होईना. तो सतत नकार द्यायचा. अनेक प्रकारे वडिलांनी त्याला समजावलं पण तो काही केल्या ऐकेनाच. त्या मुलाचं म्हणणं होतं शाळेत अनेक तासांत जो माझा अभ्यास होतो तो मी घरी राहून काही वेळेतच करू शकतो. मग मी शाळेत का जाऊ? वडिलांनी मुलाला बरंच समजावलं. एक वेळ ओरडलेदेखील पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग वडिलांनी बराच विचार केला आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. एक प्रकारची जणू काही मुलाला त्याचं म्हणणं पटवून देण्याची संधी ते त्याला देत होते. त्यांनी मुलाला सांगितलं तू काही दिवस घरी बसून अभ्यास कर.

प्रतिमा

दुपारची वेळ. घरात आई आणि मुलगी अशा दोघीच. मुलीला झोपवल्यावर आईदेखील थोडावेळ तिच्या शेजारीच पहुडते. काही वेळाने मध्येच मुलीला जाग येते. काय आणि कसं सुचतं कुणास ठाऊक पण तिला आईप्रमाणेच स्वयंपाकघरात जाऊन काम करण्याची लहर येते. ती ठरवते आपणसुद्धा आईप्रमाणेच भाजी चिरूया. ती रोज आईला भाजी चिरताना बघतच असते आणि अगदी तसंच आपणसुद्धा भाजी चिरून आईला थोडी मदत करावी असं तिला वाटतं. पण सुरी कशी घ्यायची कारण ती तर ओट्यावर आहे आणि तिची उंची तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग ती बाहेरच्या खोलीतून एक खुर्ची हळूहळू (आवाज न करता) स्वयंपाकघरात ओढत आणते. खुर्चीवर चढून ती ओट्यावरील सुरी आधी घेते.

कुठल्याही आधाराशिवाय

१९९६ सालची हकीगत आहे.  मी कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे विद्युत अभियांत्रिकीच्या पदविकेचा अभ्यासक्रम शिकत होतो.    शेवटचे सत्र सुरू होते आणि आम्हाला एक विषय निवडून त्यावर सेमिनार सादर करावयाचा होता.  त्या काळी ओव्हर हेड प्रोजेक्टर वर स्लाईडस दाखविण्याची पद्धत होती.  याकरिता ट्रान्स्परंट शीट (पॉलिथिन पासून बनलेल्या) विकत घेऊन त्यावर फोटोकॉपी करून घ्याव्या लागत.

स्वीकार

स्वीकार

तसं ४०-५० उंबरठ्यांचं गाव. फार मोठंही नाही आणि नावाजलेलंही नाही. आज गावासाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या गावातील एक मुलगा शहरात जाऊन रितसर शिक्षण घेऊन गावात परत येणार आहे. गावातील तो पहिलाच मुलगा आहे जो शहरात एवढं शिक्षण घेऊन गावात परतणार आहे आणि त्यामुळे गावाला त्या मुलाचं फार कौतुक वाटतंय. गावातील वृद्ध व्यक्तिंना बर्याच वर्षांपूर्वीची गावभर दुडूदुडू धावणारी त्या मुलाची लहान पावलं आठवत आहेत. आईवडिलांना आणि भावा-बहिणींना तर आज अभिमान वाटावा असं काही घडणार आहे. ज्याची गाव उत्सुकतेने वाट पाहत होतं त्या मुलाचं गावात आगमन होतं. पण आता तो लहान राहिला नसून तरुण झालाय.