हम तो सिर्फ सुंघ के बताते है ।
हा किस्सा माझा मित्र प्रकाश याने खूप वर्षापूर्वी सांगितला होता, तो आठवला की आजही धमाल हसायला येते. त्याचे झाले असे...
प्रकाश त्यावेळी 'फिलिप्स' च्या इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट्स च्या वॉरंटी सर्व्हिस विभागात सुपरवायझर म्हणून काम करत होता होता. एकदा 'मंदार', हा प्रकाशच्या हाताखाली काम करणारा एक शिकाऊ (ट्रेनी) इंजिनियर, त्याच्याकडे आला...
"सर, ह्या इंस्ट्रूमेंट मध्ये काय फॉल्ट आहे तेच समजत नाही, सगळ्या टेस्ट्स केल्या, आख्खा दिवस गेला त्यात, सॉरी सर, पण फॉल्ट सापडला नाही.."