युति का तुटली ? भाग १

माझा राजकारणाचा अभ्यास नाही व तो माझा प्रांतही नाही. मी नेहमी त्यापासून लांब राहत आलो आहे. पण भाऊ तोरसेकर यांच्या एका लेखाची लिंक मला माझ्या पुतण्याने वर्षापूर्वी पाठवली होती. वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या वाचून माझे मोदींबाबत जे मत तयार झाले होते त्याच्या पेक्षा अगदीच वेगळे वाचायला मिळाल्याने माझे कुतहूल जागे झाले. आंणखी काही लेख वाचल्यावर माझ्या लक्षात आले की परीस्थोती खूप झपाट्याने व आमूलाग्र बदलते आहे. व याकडे काणाडोळा करून चालणार नाही. मग मात्र भाऊ तोरसेकरांचे जागतापहारा, उलटतपासणी व पंचनामा हे तीनही ब्लॉग वरील सर्व लेख वाचले. मानुषी या साईटवरील माहिती पण वाचनात आली.

प्रावश

भोवताली दाटलेल्या आकाशात सैरभैर झालेलं असतं तुझं माझं आयुष्य. दोघांची मनं घिरट्या घालतात अवतीभवती. तुझी गरूडझेप आणि माझं स्वतःच्या अस्तित्वाभोवती घुटमळणं.

माझी समजूत घातलेली असते मी मला जमेल तशी पण कधीतरी बंड करून उठतं माझ्या डोळ्यांच्या पापणीत जपलेलं माझं आणि फक्त माझं स्वप्नं

तुझा हात हातात घेऊन मोठ्या अभिमानाने चालले होते मी सप्तपदी, दिली होती वचनं तुझ्यापासून काहीही न लपवण्याची. सगळीच होती फसवणूक आपण केलेली आणि  करून घेतलेली. खर्‍या संसारात बरंच काही लपवलं होतं. जाणूनबुजून नसेलही ते पण शेवटी फसवणूकच ती.

आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध