नुकताच PK सिनेमा पहिला. म्हणाला तर तसे फार काही वेगळे दाखवले नाही किंबहुना आपले अनिंसवाले दाभोलकर आणि बरेच सुधारणावादी लोक पूर्वी पासून काही वेगळे सांगतात असे नाही वाटले. मराठीतला देऊळ काय किंवा हिंदी मधला OMG काय तेच संदेश देणारे चित्रपट होते - भोंदूगिरी पासून सावधान. मग याचाच इतका गोंधळ का? जाहिरातबाजीचा प्रकार हा भाग वगळता, मला वाटते एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला की गोंधळ होतो, म्हणजे संदेश द्या पण एकाच धर्म बद्दल तेच तेच सांगून काय वेगळे मिळवणार आहेत हे लोक?
हिंदू धर्मात अंधश्रद्धा होती आणि आहे, पण मग ती इतर धर्मात नाही का?