"तर मित्रांनो आणि शत्रूंनो, मोठ्यांनो आणि छोट्यांनो, शहाण्यांनो आणि गधड्यांनो, दोन आठवड्यांपूर्वी ठरल्याप्रमाणे आता सज्ज व्हा कीर्तनाला! आजचे आख्यान आहे नॅनोपुराण आणि आजची मुख्य कीर्तनकार आहे मेऽडमॉयशेऽऽल ग्रेसी ऊर्फ माझी स्वीऽऽट स्वीऽऽट आई. साहाय्यकाच्या भूमिकेत इथून आहेत माझे ग्रेट पप्पा ऊर्फ मिस्टर रिची आणि आमचे महामूर्ख ज्येष्ठ बंधू आदित्य. अर्थात जिच्यामुळे आपण नॅनोगाडी चालू करतो आहोत ती माही देखील हजर आहे." सारा.
"अगोदर पप्पूचे होऊंजात का क्वान्टम मेकॅनिक्सवर? मग सोपं जाईल." ग्रेसी.
चहा आणि कॉफी ही खरी तर जागतिक स्तरावरची पेये. पण आपण ज्या प्रकारे त्यांचे देशीकरण केले आहे ते पाहता अजून दोनेक हजार वर्षांनी त्यावेळी 'भारताची उज्ज्वल परंपरा' शोधणाऱ्या मंडळींनी ही पेये मूळची भारतातलीच असा दावा केल्यास आश्चर्य वाटू नये. बालपणी माझा प्रथम संबंध आला तो चहाशी. गंगावेशीतला आज्जीकडे गेले की आम्हां लहान मुलांना 'चहा' देण्यात येई. म्हणजे काय, तर फुलपात्रभर दुधात दोन चमचे (मुळातला दुधाळ) चहा घालून ते पेय आमच्या गळी उतरवण्यात येई. मला जरी दुधाची साफ नावड असली तरी तो 'चहा' मला अजूनच भयानक वाटे.
कणीक २ वाट्या, बेसन १/२ वाटी, जिरे, मिरे १ - १ चमचा
मीठ , तेल, तूप
मार्गदर्शन कणीक व बेसन एकत्र चाळावी. त्यात जिरे भाजून जाडसर वाटून व मिरी भरड कुटून टाकावे. तुपाचे मोहन घालावे. चवीनुसार मीठ घालून अर्धा तास भिजवून ठेवावे. नंतर, घडीच्या पोळ्या करतो (दोन तीनदा फोल्डस करुन) त्याप्रमाणे पराठे त्रिकोणी आकारात लाटून तव्यावर तेल सोडून खुसखूशीत भाजावेत. ताजे लोणी, लिंबाचे लोणचे अथवा पुदिना चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.