तीन वर्षापूर्वी मी "क्ष" या कंपनीत एक कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्रॅम केला होता. 'विश्वास' त्याचा संयोजक (प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर) होता. त्यावेळी त्याच्याशी ओळख झाली, एकाच वयाचे असल्याने आमची मैत्री ही चांगली जमली. मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यासक तर विश्वास एकदम नास्तिक, ज्योतिषाची हेटाळणी करणारा. पण या गोष्टीची आमच्या मैत्रीस कसलीही बाधा आली नाही.
27 जानेवारी 2013, रविवार होता, सुट्टीचा दिवस,त्यात दुपारची वेळ त्यामुळे अंमळ विश्रांती घेत होतो - म्हणजेच चक्क लोळत होतो तोच फोन वाजला, डोळ्यावरची झोप आवरत मी फोन घेतला. विश्वासचा फोन होता.