पांढऱ्या रंगाची मोटार तिच्या बॉनेटवरील छोट्या तिरंग्याला फ़डकावत ,पोलिस कमीशनर ऑफ़िसच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडून,डाव्या बाजूला वळाली.तिच्या पाठोपाठ एक जीपगाडी बाहेर पडली अन् पांढऱ्या मोटारीच्या मागे सुरक्षित अंतर ठेवून धावू लागली. जी.पी. ओ.मागे पडले.साधू वासवानींच्या पुतळ्याला डावी घालून पुढे अलंकार चौकापर्यंत या गाड्या आल्या आणि चौकात ट्रॅफ़िक कंट्रोल करणाऱ्या पोलिसाची पाठ पाहून ड्रायव्हरने कचकन् ब्रेक लावल्याने पांढरी मोटार थांबली.तिच्या मागोमाग येणाऱ्या जीपला थांबावेच लागले.पुढील गाडीतील ड्रायव्हरने गाडी थांबल्या-थांबल्या पान परागची पुडी काढली.ती दातात धरून ,त्याने तिची वरची कड तोडली आणि तोंडाचा आऽ वासून त्या पुडीतील आख्खा मसाला तोंडात रिकामा केला.पुडीचा कागद चुरगाळून उजव्या बाजूच्या उघड्या खिडकीतून फ़ेकून दिला.मागच्या जीपच्या ड्रायव्हरने ही स्टियरींग व्हीलवरील हात न काढता ,फ़क्त मान वाकडी करून उजव्या बाजूला पिचकारी मारली. झेब्रा-क्रॉसचा पट्टा निम्म्यापेक्षा जास्त पार करून पुढे थांबू पहाणाऱ्या बाईक चालकावर त्या पिचकारीचा वर्षाव झालाच. बाईक -स्वाराने मागे येवून ,काही म्हणायच्या आधीच,हिरवा सिग्नल मिळाला अन् पुढची गाडी सुरू झाली.जीप ड्रायव्हरने ही त्या बाईक-स्वाराकडे न पाहिल्यासारखे केले अन् पुढची गाडी-पांढरी ऍंबॅसिडर वळाली,त्या दिशेने जीप दामटली. त्या बाइक-स्वारानेही पुढे नजर ठेवून ,बाईक अशी पळविली की,'धूम' मधल्या 'जॉन अब्राहम'ला ही धडकी भरावी ! अँबॅसिडरला फ़ार लांब जायचे नव्हतेच.तिने पुणे-रेल्वे स्टेशन आवाराचे दिशेने वळण घेतले.तिच्या पाठोपाठ जीप गाडी ही घुसली.
(ज्यांची मुले परदेशात गेली आहेत वा जाऊन स्थायिक झाली आहेत अशाना परदेशगमन हे वारीसारखे नित्यकर्म होते. अशा वारीतील काही अनुभव
काशीस जावे नित्य वदावे असे जुन्या काळी म्हणजे ६०-७० वर्षापूर्वी (किंवा त्याहीपूर्वी)म्हटले जायचे.त्यावेळीच्या मध्यमवर्गीयांच हे स्वप्न असायच.त्यावेळच्या लोकांची स्वप्नही फारशी उच्च प्रतीची नसायची,त्यातले हे त्यामानाने बरेच वरच्या दर्जाचे ! इंग्रजांच्या काळात इतकी सुरक्षितता होती की काठीला सोने लावून खुशाल काशीयात्रा करून यावे असे त्या लोकांच म्हणण असल तरी इंग्रजान काठीला लावायला सोनच इतक कमी ठेवल होत की काठीला सोन बांधून काशीला जाऊ इच्छिणारा त्याअगोदर स्वर्गाचीच वाट धरायचा.
पण आता मात्र जो तो काशीलाच काय परदेशातच पळतोय.मात्र स्वतःच्या खर्चाने परदेशी जाण्यापेक्षा परदेशी कंपनीने किंवा आणखी कोणी आमंत्रित केले म्हणून आणि पेपरात फोटो वगैरे छापून येऊन परदेशी जाण्यातली ऐट काही वेगळीच! तसा स्वखर्चाने जाणाऱ्याना फोटोही स्वखर्चाने (जाहिरातीच्या दरात)छापून घेता येतो म्हणा ! सरकारी खर्चाने जाता येण्यासाठी तुम्ही मंत्री अगर किमान नगरसेवक तरी असावे लागते.मग स्वदेशात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीची पहाणी परदेशात करण्याच्या महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात तुमचा समावेश होऊ शकतो.
मी अभियांत्रिकी पदवीधर असलो तरी त्या काळात अभियंत्याना परदेशी पाठवणे भारतीय कंपन्याना कमीपणाचे (पेक्षा अनावश्यक आणि खर्चिक) वाटे, तरीही जी काही थोडीफार शक्यता असे तीही मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होऊन आपल्या वाट्याला येणार नाही याची काळजी घेतली होती. नाही म्हणायला तशी एक शिष्यवृत्ती होती. त्यात तंत्रशिक्षकाना (त्यावेळच्या) पश्चिम जर्मनीस पाठवण्यात येई. ती शिष्यवृत्ती घेऊन प्राध्यापक प. जर्मनीस जाऊन काय शिकून येत कोणास ठाऊक कारण या योजनेतून जाऊन येणाऱ्या प्राध्यापकानी तेथे काय शिकवण्यात आले याविषयी कधी एक चकार शब्द उच्चारल्याचे ऐकिवात नाही शिष्यवृत्ती देण्यापूर्वी अशी अटच तंत्रशिक्षण खात्याकडून घालण्यात येत असावी.याबाबतीत सर्वच सरकारी खात्याइतकेच किंवा जरा अधिकच हे खाते दक्ष ! ( त्यावेळी अण्णा हजारे यांचे माहितीच्या अधिकारासाठीचे उपोषण व्हायचे होते.) त्यामुळे शिक्षकाने आपली पात्रता वाढवू नये आणि एकाद्याने स्वत: च्या प्रयत्नाने वाढवलीच तर तिचा उपयोग तंत्रशिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तरी करू नये असा दंडकच त्या काळी होता. तरीही मी नुकताच नोकरीला लागल्यामुळे या सगळ्या खाचाखोचा मला माहीत नसल्यामुळे त्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यावर मी खरेच आपण प. जर्मनीला जाणार अशा गोड धुंदीत काही दिवस वावरलो त्यासाठी जर्मन शिकण्याचा उपद्याप पण केला.पण मंत्री नगरसेवक अशा महत्त्वाच्या व्यक्तीना महत्त्वाच्या कामासाठी परदेशात पाठवण्यातच सरकारच्या परदेशी चलनाची (अक्षरशः)वाट लागत असल्याने प्राध्यापकाना परदेशात पाठवून त्यांचा दर्जा वाढवण्याची चैन सरकारला परवडण्यासारखी नव्हती त्यामुळे माझा परदेश या शब्दाशी संबंध केवळ परदेश शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना लागणारी शिफारसपत्रे देण्यापुरताच काय तो राहिला पण माझ्या हातावर विधात्याने मारून ठेवलेली परदेशगमनाची रेखा अशी थोडीच वाया जाणार होती? त्यामुळे मुलगा परदेशी गेल्यामुळे का होईना आम्हालाही परदेशगमनाचा योग आलाच पण तो त्यानंतर जवळ जवळ ३५-३६ वर्षानी म्हणजे मी सेवानिवृत्त झाल्यावर !
आमचे चिरंजीव माझ्यासारखे " असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" म्हणून कोणी आपल्याला परदेशी पाठवील अशा भ्रमात न रहाणारे असल्यामुळे अभियांत्रिकी पदवी प्राप्त होताच आम्हाला पत्ताही लागू न देता त्याने खटपट करून एक दिवस आपण अमेरिकेत जाणार आहोत असे जाहीर केले.अर्थात मला जे जमले नाही ते त्याने जमवल्याचा आम्हाला आनंदच झाला. तो जाऊन दोन वर्षे झाल्यावर तो आता लवकर परत येत नाही अशी खात्री झाल्यावर मात्र एकदिवस आम्हाला जावे लागेल अशी आशा वाटू लागून पारपत्र म्हणजे पासपोर्ट मिळवण्याच्या मागे आम्ही लागायचे ठरवले.अशा बाबतीत चालढकल करण्यात मी पटाईत आहे. पण त्यावेळी मी औरंगाबादला होतो आणि तेथे पासपोर्ट ऑफिस नुकतेच निघाले होते आणि ही बातमी फारच कमी लोकाना माहीत होती इतकी की मी त्या ऑफीसमध्ये गेलो तेव्हा तेथे पासपोर्टसाठी फॉर्म मागायलासुद्धा माझ्याव्यतिरिक्त फक्त एकच गृहस्थ तेथे असलेल्या एकुलत्या एक खिडकीपाशी होता.त्यामुळे फार लांबलचक रांग आहे अशा छान कारणासाठी माझा पासपोर्ट काढण्याचा विचार रद्द करणे मला शक्य झाले नाही. या वेळी आम्हाला परदेशी पाठवण्याचा जणु चंगच दैवाने बांधला होता .
पारपत्रासाठी अर्ज करण्याचा विहित नमुना मिळाल्यावर तो घरी आणून त्यावर पुरेशी धूळ जमण्याची मी वाट पाहिलीच त्याशिवाय अर्जासोबत जोडावयास लागणाऱ्या एका प्रमाणपत्राची त्रुटी माझ्याकडे होती . म्हणजे आमच्या लग्नाचे प्रमाणपत्र माझ्याकडे नव्हते (.पूर्वी नवराबायकोचा एकमेकावर भरभ्क्कम विश्वास असल्यामुळे अशा प्रमाणपत्राची गरज पडत नसावी) आणि ते मिळवण्यासाठी पुन्हा लग्न करणे शक्य नव्हते.त्यासाठी एक शपथपत्र करून भागणार होते असे या गोष्टीचा अनुभव असणाऱ्या माझ्या मित्राने मला सांगितले पण त्यासाठी लागणाऱ्या स्टॅंपपेपरचा नेहमीप्रमाणे दुष्काळ होता.अर्थात मला चालढकल करायला आणखीच चांगले कारण मिळाले. तेवढ्यात माझ्या आणखी एका मित्राची मुलगी परदेशी गेलेली असल्याने तोही माझ्याशी या विषयावर बोलल्यावर आणि तो माझ्याहूनही चालढकलप्रवीण असताना त्याने पारपत्र काढलेसुद्धा हे ऐकल्यावर मात्र मी एकदम जागृत झालो पण त्याने माझ्यावर आणखी एक बोंबगोळा टाकला. त्याने सांगितले की आपण सरकारी सेवेत असताना पारपत्र काढायचे असल्यास संबंधित खात्याच्या प्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र लागते.म्हणजे थोडक्यात माझ्या थोड्याफार झालेल्या मानसिक तयारीला खीळ घालण्याचे काम या बातमीने केले.त्यतल्यात्यात सुदैवाची गोष्ट एवढीच होती की असा अर्ज मला आमच्या महाविद्यालयाच्याच कार्यालयात देऊन तो पुढे तंत्रशिक्षण संचालकांकडे पाठवण्याची विनंती केली की भागणार होते आणि अशा लिखापढीत शिक्षकी पेशात असल्याने मी चांगलाच तयार असल्याने असा अर्ज कार्यालयात सादर करून माझे वाट पहाण्याचे व्रत मी इमाने इतबारे चालवले.तेवढ्या काळात लग्नाच्या प्रमाणपत्राविषयी हालचाल करावी असा मी मानसिक प्रयत्न करत होतो कारण शारीरिक हालचाल होण्यासाठी मनाची तयारी आवश्यक असते ना ! पण तेवढ्यात मला आठवले की फार पूर्वी सौभाग्यवतीस तिचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याची इच्छा झाली असताना लग्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता पडली होती. त्यावेळी पाच रुपयाच्या स्टॅंपपेपरवर लग्न केल्याचे शपथपत्र तिला विद्यापीठात सादर करावे लागले होते. माझ्या वकील मित्रानेच तो स्टॅंपपेपर आणून मला कोर्टाची पायरी चढायला लावले होते. न्यायाधीशमहारांजांशी हस्तांदोलन करण्याचा अगाऊपणा माझ्या हातून घडत होता तो त्याने मोठ्या शिताफीने मध्ये पडून टाळला होता. त्या शपथ पत्राची प्रत विद्यापीठास तिने दिली होती अर्थात मूळ प्रत घरातच असण्याची शक्यता होती आणि या वेळी मात्र आमच्या दोघांच्याही व्यवस्थितपणामुळे ते शपथपत्र सापडायला मुळीच त्रास झाला नाही. मात्र हे पाच रुपयाचे प्रमाणपत्र चालते की नाही अशी शंका आम्हा दोघानाही वाटत होती कारण मला तद्विषयक सल्ला देणाऱ्या मित्राला त्यासाठी कमीतकमी वीस रुपयांचा तरी स्टॅंपपेपर लागतो असे सांगण्यात आले होते तरीही आता तरी तेच द्यायचे आणि बघू पुढे काय होते ते असा निर्णय आम्ही घेतला. आणि आम्ही चेंडू तंत्रशिक्षण संचालकांकडे टोलवल्यामुळे सध्यापुरतातरी तो विषय पार विसरून गेलो .
मला परदेशात जायची मुळीच घाई नाही हे आमच्या तंत्रशिक्षण कार्यालयासही समजल्यामुळे नेहमीची दफ्तरदिरंगाई न करता एक दिवस अगदी अलगदपणे ना हरकत प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात अवतीर्ण झाले. त्यानुसार मी परदेशात कुठल्याही प्रकारचे गैर वर्तन न करण्याच्या बोलीवर तसे प्रमाणपत्र मला देण्यात येत आहे असे लिहिले होते.मी बायकोसह जात आहे हे कळले असते तर त्यानी अशी शंकाही व्यक्त केली नसती अशी मला खात्री वाटते.
पारपत्र दाखल करण्यासाठी काही लोक मध्यस्थ वापरतात. हे मध्यस्थ अर्ज कार्यालयात दाखल करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा इतरांचा अनुभव आहे. आणि अजूनही औरंगाबादच्या पारपत्र कार्यालयास म्हणावी तशी ऊर्जितावस्था प्राप्त झालेली नसल्याने केवळ अर्ज दाखल करण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक करावी असे मला वाटले नाही.आता मात्र पारपत्रासाठी अर्ज दाखल करण्यात कसलाच अडथळा न उरल्याने मला दोघांचे अर्ज दाखल करावे लागले. मला पारपत्र मिळण्याची मुळीच घाई नाही याची कुणकुण पारपत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कशी लागली देव जाणे आणि त्यामुळे या कामासाठी विलंब लावण्याचा त्यांचा उत्साहच नष्ट झाला असावा ! पण तरीही काही अडथळे शिल्लक होतेच, काऱण मी महाविद्यालयातून एक दिवस घरी आलो तेव्हा घरी पोलिस येऊन गेल्याची सुवार्ता सौ. ने माझ्या कानावर घातली . सुदैवाने त्यावेळपर्यंत दूरदर्शनवर मालिकांचा सुळसुळाट झाला नव्हता त्यामुळे त्या बातमीने माझ्या मनावर कसलीच उलटसुलट प्रतिक्रिया झाली नाही शिवाय मालिकेत अशा वेळी त्या भागाचा शेवट करून प्रेक्षकाना पुढील दिवसापर्यंत टांगून ठेवतात तसे काहीही न करता लगेचच तो पारपत्रासाठी पोलिस तपास करायला आला होता हेही तिने सांगून टाकले. अशा वेळी पोलिस कार्यालयात जाऊन त्यांची गाठ घेऊन योग्य ती दक्षिणा द्यायची असते असे शहाण्या माणसांनी सांगून ठेवले आहे.खर तर मला पारपत्र मिळायला कितीही उशीर झाला तरी हरकत नाही अशी माझ्या मनाची तयारी असल्याने त्या शहाण्या माणसांचा सल्ला पाळण्याचे मला कारण नव्हते. पण " होणारे न चुके जरि तया ब्रह्मा असे आडवा " असे म्हणतात ना ! त्यामुळे आमच्या पोलिस तपासातही काही अडचण राहिली नाही असेही सौ. ने मला सुनावले. त्याचे कारणही तसेच मजेदार होते.त्यावेळी औरंगाबादला असणारे पोलिस कमिशनर तिच्या नात्यात होते आणि ते एकदोनदा आमच्या घरी आल्याचे तपासणी करणाऱ्या पोलिसाने पाहिले होते ते तुमचे कोण एवढ्या प्रश्नाचे उत्तर आमची तपासणी विशिष्ट प्रकारे न करण्यास पुरेसे झाले. आणि खरोखरच एक दिवस रजिष्टर पोस्टाने आमचे दोघांचेही पासपोर्ट घरबसल्या आमच्या हातात पडले
पारपत्र जरी १९९९ च्या शेवटीशेवटी मिळाले तरी अमेरिकेला जाण्याचा योग मात्र तब्बल तीन साडेतीन वर्षानी म्हणजे २००२ च्या मे महिन्यात आला.खरे तर आता योग आणणे आमच्याच हातात होते पण मी नोकरी करीत असताना गेल्यास फार दिवस रहाता येणार नाही अशी शक्यता होती. असे घाईघाईने जाऊन येण्यात आता आम्हाला स्वारस्य नव्हते. जायचे तर आरामशीरपणे जाऊन यावयास हवे असे आम्हास वाटत होते. आणि त्याप्रमाणे मी सेवानिवृत्त झाल्यावर आता आम्हाला जाण्यास काही अडचण नाही या कल्पनेने चिरंजीवानी आम्हाला तिकिटे आणि यू.एस. भेटीचे निमंत्रणही पाठवून दिले असे निमंत्रण व्हिसा मिळण्यासाठी आवश्यक असते म्हणे.
त्यामुळे तिकिट मिळाल्यामुळे आता व्हिसा मिळवण्याच्या मागे लागणे आवश्यक होते.या बाबतीत आपण भारतीय जितके उदारहृदयी तितकेच हे अमेरिकन लोक संकुचित वृत्तीचे ! त्यामुळे अमेरिकन कॉन्सुलेटसमोर व्हिसा मिळवण्यासाठी उत्सुक भारतीयांच्या रांगा लागलेल्या असतात असा पूर्वी जाऊन आलेल्यांचा अनुभव होता.त्यांनी सांगितलेल्या हकीकतींवरून त्यासाठी अर्ज भरून दिल्यावर महिन्यादोनमहिन्यानी मुलाखतीला बोलावतात ,तेथे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या प्रश्नाच्या फैरीला तोंड द्यावे लागते.ते काय विचारतील याचा नेम नाही, अमेरिकेला कशाला जाताय , कुणाकडे जाताय,तिथे जाऊन काय करणार,तेथे तुमचा खर्च कोण करणार एक ना दोन अरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात.आमच्याकडे पहा बरे कसे आवजाव घर तुम्हारा.कोण आल कोण गेल याकडे लक्ष देण्याचा आगाऊपणा आम्ही करतो तरी का? मुळीच नाही.काही दिवस त्यांना घुसखोर म्हटले तरी नंतर तेच आमच्यावर दादागिरी करू लागतात. बरेचदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकही आमच्याकडे येऊन गेल्यावर मग आम्हास जाग येते आणि त्यानंतर त्यांचा पाहुणचार करायचा राहिला ही रुखरुख दूर करण्यासाठी त्यांना आपल्याकडे पाठवावे म्हणून पोर्तुगाल,पाकिस्तान अशा मित्रांची विनवणी करावी लागते. आपली ही सहिष्णुतेची ऐतिहासिक परंपरा कोठे आणि हे अमेरिकन लोक म्हणजे असहिष्णुतेचा कळस. बोटाचे ठसे काय , समोरून बाजूनी फोटो काय काही विचारू नका?जॉर्ज फर्नंडिससारखे लढाऊ व्यक्तिमत्वसुद्धा यांच्या तडाक्यातून सुटले नाही तेथे आमच्यासारख्यांची काय कथा !त्यातून ९/११ नंतर मामला अधिकच कडक झालेला.
मुलाखतीला गेलेल्या एका मित्राने मुलीच्या बाळंतपणासाठी जातो असे सांगण्याचा त्याच्यामते चतुरपणा केला तर त्यासाठी तुम्हाला जायच कारण नाही आमच्या देशात हॉस्पिटलात सगळ व्यवस्थित करतात असे सांगून त्याला माघारी पाठवण्यात आले तर दुसऱ्या एका असाच चतुरपणा करणाऱ्या मित्राच्या बायकोला तुम्ही एकट्या मॅनेज करू शकाल का असे विचारून तिला एकटीलाच व्हिसा देऊन मुलीच्या बापाला हात चोळत गप्प बसवले.आमच्या एका स्नेह्याच्या भावी जावयाच्या अडचणीमुळे त्यानी मुलीला वेगळ्या पद्धतीने व्हिसा मिळवून देऊन अमेरिकेत पाठवले आणि लग्न अमेरिकेत करण्याचा घाट घातला तर आता तिच्या आईबापानाच व्हिसा मिळून लग्नास हजर रहाता येईल की नाही अशी पंचाईत निर्माण झाली आहे अशा व्हिसाविषयक कहाण्या ऐकून आपल्याला व्हिसा न मिळाल्यामुळे आपले पोराने पाठवलेले तिकिट रद्द करावे लागते की काय अशी भीती मला पडली. पण या सर्व संकटांना तोंड देऊन जाण्याचा प्रयत्नही मी कदाचित करणार नाही या शंकेने बुशमहाराजांनी प्रसन्न होऊन त्याच सुमारास एक नवी योजना अमलात आणण्याचा सुविचार केला होता.
आमच्याचबरोबर आमचे आणखी एक मित्रही त्यांच्या मुलाच्या अडचणीवर मात करण्यासाठी अमेरिकेला प्रथमच निघाले होते. म्हणजे आमच्या वयाचे पालक अमेरिकेतील मुलांकडे जातात ते आपल्या सुनेच्या अथवा मुलीच्या प्रसूतीसाठी म्हणजे ड्यूटीवर आणि आमच्यासारखे जाणारे म्हणजे सुट्टीवर जाणारे अशी वर्गवारी करण्यात येते त्यामध्ये ते ड्यूटीवर जाणार होते अर्थात त्यांचे जाणे अधिक महत्त्वाचे होते त्यामुळे जोडीदार म्हणून त्यांना बरोबर घेऊन जावे असा विचार मी केला आणि एका सुप्रभाती आम्ही दोघे पुण्यातील व्हिसाऑफिसला गेलो. अर्थात तोपर्यंत बुशमहाराजांचे हृदयपरिवर्तन झाल्याची बातमी आमच्यापर्यंत पोचली नसल्याने आम्ही आपले आपल्याला मुलाखतीला बोलावल्यास मराठीत बोलायचे की इंग्लिशमध्ये बोलायचे याविषयीच चर्चा करत होतो कारण अमेरिकन इंग्लिश उच्चार आम्हाला कळणार नाहीत तेवढेच आमचे फर्डा इंग्रजी त्यांना समजणार नाही (कारण दोघेही प्राध्यापक)अशी दुहेरी खात्री आम्हाला होती त्यामुळे हा प्रश्न दुभाषाची मदत घेऊन सोडवायचा निर्णय आम्ही करत होतो.व्हिसा ऑफिसच्या पायऱ्या चढण्यापूर्वी एक सुटाबुटातील व्यक्ती हातात बॅग घेऊन उभी होती. त्यामुळे तिला पहाताच आम्ही आपले त्या इमारतीत व्हिसासाठी आवेदनपत्र कोठे मिळेल याची चौकशी केली आणि अहो आश्चर्यम् जणु आमचीच वाट पहात असल्यासारखी त्या व्यक्तीने आपल्या बॅगेतून सरळ व्हिसासाठी लागणारे आवेदनपत्रांचे नमुनेच काढून दिले आणि त्यानंतर जी बातमी सांगितली त्यामुळे आम्हाला आनंदाने वेडच लागायचे राहिले कारण त्याच वर्षी बुशसाहेबानी कृपावंत होऊन पेटी परवाना पद्धत (ड्रॉप बॉक्स )ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली होती.त्यानुसार पुण्यातील नागरिकांना पुण्यातील कॉन्सुलेटच्या ऑफिसमध्ये अर्ज सर्व प्रमाणपत्रांसह आणि आवश्यक शुल्काच्या धनादेशासह दाखल केल्यावर तसे प्रमाणपत्र मिळेल, आणि चार पाच दिवसात तुमच्या घरच्या पत्त्यावर कोरियरने व्हिसाच येईल,ते प्रमाणपत्र दाखवल्याव्वर ते तुमच्या हाती पडतील असे सांगण्यात आले आणि अत्यानंदाने ते आवेदनपत्राचे नमुने घेऊन आम्ही घरी परतलो. ते भरून त्यासोबत योग्य रकमेचा धनादेश मिळवण्यासाठी मी जवळची आणि आपली म्हणून महाबँकेत गेलो तर त्यानी तुम्ही बँकेचे खातेदार आहात का अशी सुरवात केल्यावर कदाचित व्हिसा ऑफिसपेक्षाही इथले लोक अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे असे वाटून मी दुसऱ्या पण जवळच्याच बँकेतून ड्राफ्ट काढला आणि दुसऱ्याच दिवशी सर्व कागदपत्रांसह सौभाग्यवतीलाही घेऊन व्हिसा ऑफिसला गेलो तिला मुलाखतीसाठी नाही तरी निदान ऑफिस कसले आहे हे कळावे आणि मला जरा नैतिक धैर्य प्राप्त व्हावे म्हणून ! आम्हाला कसलेच प्रश्न न विचारता आमचे कागदपत्र खिडकीतील गोऱ्या महिलेने घेतले आणि तपासून आम्हाला तशा अर्थाची पावती दिली.आणि चार दिवसानी घरच्या पत्त्यावर व्हिसा येईल ही पावती देऊन ते ताब्यात घ्या असे तिने सांगितल्यावर मोठ्या धाडसाने मी मग आम्हाला दहा वर्षाचा व्हिसा मिळेल का असा प्रश्न विचारल्यावर तिने हे मुंबईच्या ऑफिसमधील लोक ठरवतील असे सांगून आमची बोळवण केली चार दिवस जीव टांगणीला लागल्यावर अखेर पाचव्या दिवशी खरोखरच कूरियरने दोघांचे व्हिसा (की व्हिसे ?) आले आणि अहो आश्चर्यम् ! आम्हाला चक्क दहा वर्षाचा अनेकप्रवेशी ( मल्टिपल एंट्री ) व्हिसा मंजूर होऊन आला होता.
तीसेक वर्षांपूर्वी आम्ही जनता शिशुमंदिरात पायधूळ झाडली होती, आणि त्या वेळेस त्या अपरिपक्व बालक-बालिकांच्या लीलांनी आम्हाला अचानक पळ काढावा लागला होता हे सर्वांस विदीत असेलच. तीस वर्षांनंतर आता पुन्हा एकदा तत्सम बालक-बालिकांची स्थिती काय आहे ते बघावे अशी विपरीत बुद्धी आम्हाला झाली आणि जे घडले त्याचा हा वृतांत.
नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवाच्या सर्व वाचकांस मन: पुर्वक शुभेच्छा !!!
नोकरी निमीत्ताने चाकरमानी (या शब्दाचा नक्की अर्थ काय ?) मंडळी आपापले गाव सोडुन बाहेर पडली आणि पोटापाण्यासाठी साता-समुद्राकडे जाउन स्थायिक झाली. या सगळ्या उद्योगात काही हरवलं काही गवसलं.
माणसाचा जन्म हिंदू धर्म संकल्पनेनुसार चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर प्राप्त होतो.याजन्मात भक्तीद्वारे ईश्वराला प्रसन्न करून 'जन्म-मृत्यू'च्या चक्रातून सुटका करून घ्यायची,असे संत-महात्मे सांगतात.पण बहुसंख्य माणसे याकडे दुर्लक्ष करुन माया-मैथूनात अडकून पडतात व जन्म-मरणाच्याचक्रातून बाहेर पदू शकत नाहीत̱. गर्भावस्था,बालपण,लहान-मोठे आजार,शारीरिक व्यंगे आणि मर्यादा,शिक्षण ग्रहण काळातील कष्ट आणि तणाव ,त्यानंतरचे व्यवसाय-नोकरीतील ताणतणाव,भिन्न-लिंगी जोडीदार व त्याबाबतचे ताणतणाव,विवाहानंतरचे ताणतणाव,अपत्य असण्या-नसण्या संदर्भातील ताणतणाव,वृथाच बाळगलेले आत्मसन्मानाचे ओझे आणि अचानक,अवेळी,अपेक्षा नसताना येणारा मृत्यू किंवा कोणत्याहि कारणामुळे हवा- हवासा वाटणारा,पण न येणारा मृत्यू,असे माणसाचे सर्वसाधारण जीवन असते.
कामावरून परतल्यानंतर मी जेवायलाच बसलो होतो. तेवढ्याच डॉलीने आठवा सूर लावला.
``ओ रे बाळा ओ. काय झालं. कुणी मारलं का माझ्या बाळाला? मी तिला गोंजारत विचारलं.``
``बाबा, मला स्कूटर पायजे.`` हुंदके देत डॉली म्हणाली.
``अगं, पण तुझ्याकडे तर भरपूर खेळणी आहेत. मग आता स्कूटर कशाला?
शहरातल्या त्या अॅम्युझमेंट पार्कात मिकी माऊसच्या वेषात तेरा चौदा वर्षांचा एक मुलगा नाचत होता. मनोरंजनाच्या मिषानेच त्याला तिथं ठेवलं होतं. येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो हस्तांदोलन करत होता. त्याला पाहून विशेषतः लहान मुलं खूप आनंदीत होत होती. त्याला पाहून त्यांच्या चिमुकल्या चेहऱ्यावर हास्य उमटत होतं. त्याच्या हातात हात मिळविण्यासाठी तेही उत्सूक दिसत होते.
तेवढ्यात नेत्यासारखी दिसणारी एक व्यक्ती शुभ्र वेषभूषेत तेथे आली. मिकी माऊसकडे त्यांनी एक छद्मी कटाक्ष टाकला आणि दुसरीकडे जाऊ लागली. तेवढ्यात त्यांना काय वाटले कुणास ठाऊक. ते त्या मिकी माऊसच्या दिशेनं गेले. त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाले,
``काय रे, आत श्वास कोंडून जीव घाबरा होत नाही का?
थीम-पार्कमध्ये एक दिवस ...
आदल्या दिवशी आम्ही 'गेंटींग हायलंड'ला पोचलो तोवर रात्र झालेली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर आधी खिडकीतून बाहेरचं दृश्य बघितल्याशिवाय मला करमलंच नसतं. सकाळची वेळ, सूर्याची कोवळी किरणं, थंडी, धुकं, हिरव्या डोंगरदऱ्या यांच्या मिश्रणातून जे तयार होतं ना त्याला केवळ 'लाजवाब' हाच एक शब्द योग्य आहे - मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा! त्यावेळची ती गार, ताजी-ताजी हवा नाकात भरून घ्यायला मला फार आवडते.
आमच्या खोलीच्या खिडकीतून हॉटेलचा परिसर दिसत होता. तिथली बाग, रस्ते काही अंतरानंतर धुक्यात हरवून गेलेले होते. लांबवर तर डोंगरसुध्दा धुक्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपल्यासारखे वाटत होते.आमच्यापैकी एक-दोन काका बागेतल्या रस्त्यावरून फिरायला निघालेले दिसले. मला हे कसं सुचलं नाही कोण जाणे. खरंतर मला पहाटे लवकर उठणं अजिबात जमत नाही आणि आवडतही नाही. पण अश्या काही मोजक्या कारणांसाठी मात्र मी पहाटे उठायला सुध्दा एका पायावर तयार असते. सकाळी फिरायला जाण्याचा बेत दुसऱ्या दिवशी अमलात आणायचा ठरवला आणि तो आईला सांगायला घाईघाईने तिच्या खोलीत गेले. ती माझी वाटच पाहत होती कारण तिच्या खोलीच्या खिडकीतून दिसणारं दृश्य तिला मला दाखवायचं होतं. मी सुध्दा अगदी जोरात 'हो, मी पण पाहिलं सकाळी उठल्याउठल्या ...' असा भाव मारत पडदे सारले और मेरी तो बोलती ही बंद हो गयी कारण मी जे
आधी पाहिलं होतं ते यापुढे काहीच नव्हतं!! इथे हॉटेलचा परिसर, रस्ते-बिस्ते काही नाही .... नजर जाईल तिकडे पामवृक्षांच्या काळपट-हिरव्या रंगात रंगलेल्या डोंगररांगा आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हात विलक्षण रंगसंगती साधत तरंगणारा धुक्याचा शुभ्र कापूस .... बस्स!! त्याच धुक्याच्या मागे आदल्या दिवशी भयाण वाटलेलं ते जंगल पसरलेलं होतं हे सांगूनही कुणाला खरं वाटलं नसतं. बऱ्याच वर्षांनी दिवसाची अशी अप्रतिम सुरूवात झाली होती. कारण, इथे वापीत राहून असं धुकं-बिकं सगळं विसरायलाच झालंय आता....
पण आदित्यच्या दृष्टीने मात्र दिवसाची सुरूवात 'डोकं पकवणारी' झाली होती. तो सबंध दिवस आम्हाला तिथल्या थीम-पार्क मध्ये घालवायचा होता. साहजिकच त्यादिवशी सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं कोण तयार झालं असेल तर आदित्य. कधी एकदा त्या थीम-पार्कचे दरवाजे उघडताहेत आणि आत घुसून तो तिथल्या वेगवेगळ्या राईड्सवर उलटापालटा, वरखाली, गोलगोल फिरायला सुरूवात करतोय असं त्याला झालं होतं. नेहेमीप्रमाणे नाश्त्याच्या ठिकाणी तो आमच्याआधी पोचला होता. जरा वेळाने मी तिथे गेले तर याचा चेहेरा पडलेला! समोर सगळे आवडीचे पदार्थ असताना आता हे काय नवीन ते मला कळेना. विचारल्यावर 'पाऊस पडतोय बाहेर' म्हणून माझ्यावरच डाफरला - . मग मला उलगडा झाला. बाहेर पाऊस म्हणजे तो थांबेपर्यंत तरी त्याला तसं उलटंपालटं होता येणार नव्हतं. वर डोकं-खाली पाय अश्याच वर्षानुवर्षांच्या अवस्थेत जमिनीवरच चालावं लागणार होतं. आता ती काही माझी चूक नव्हती. पण त्यानं त्याचा सगळा राग माझ्यावर काढला!!
... हवा किती झपाट्यानं बदलली होती! बोचरा गारवा होता म्हणून, नाहीतर मी आदित्यला घेऊन पावसात भिजायला नक्की गेले असते. पण आता नाईलाजास्तव इकडेतिकडे वेळ काढावा लागणार होता. मग आम्ही सगळेजण त्या रिसॉर्टच्या ४-५ मजल्यांवरून फेरफटका मारून आलो. सगळीकडे शॉपिंग मॉल्स, प्रदर्शनं, तरतऱ्हेच्या वस्तूंची दुकानं, उपहारगृहं अशी सरमिसळ होती. तिथे सुध्दा कुठून आलो, कुठे वळलो, किती मजले चढलो-उतरलो - काही म्हणता काही कळलं नाही. जमिनीच्या वर होतो की खाली ते ही लक्षात आलं नाही. 'तिथून पुन्हा आपापल्या खोल्यांपाशी परत जा' असं सांगितलं असतं तर कुणालाही ते जमलं नसतं. आमचा गाईड - झॅक - त्याच्यावरच आमची सगळी मदार होती. त्याच्या मागेमागे तिथे तसं फिरण्यात वेळ मात्र मस्त गेला आमचा .... आदित्य सोडून! त्याला एव्हाना 'आयुष्य व्यर्थ' वगैरे वाटायला लागलं होतं!! 'काही अर्थ नाही मलेशियाला येण्यात ...' इतपत विरक्ती पण आलेली होती....उरलासुरला राग काढायला आई होतीच!!! तासाभरानंतर मात्र पावसाला त्याची दया आली. लगेच त्याची कळी खुलली.
थीम-पार्कच्या प्रवेशद्वारापाशी प्रत्येकाच्या मनगटावर एकएक कागदाचा, barcode असलेला पट्टा गुंडाळला गेला. तो त्या पार्कचा Multiple Entry Visa होता. त्याचा अर्थ आदित्यला सांगितल्यावर तो तर नाचायचाच बाकी राहिला होता. कितीही वेळा आतबाहेर करा, कुठल्याही राईड्सवर कितीही वेळा बसा - आता त्याला कुणीही अडवणार नव्हतं - अगदी आईसुध्दा!! बॅंकॉकपासूनच तो जोशी काका-काकू आणि पूर्वाताईबरोबरच असायचा बहुतेकवेळा. त्याची आणि पूर्वाताईची एव्हाना भलतीच गट्टी जमली होती. त्यामुळे त्यादिवशीसुध्दा एकदा त्या थीमपार्कमध्ये शिरल्यावर तो त्यांच्याबरोबर जो गायब झाला माझ्यासमोरून तो थेट रात्री जेवायच्यावेळी पुन्हा भेटला मला. दिवसभर फक्त अधूनमधून कुठेतरी माझ्या दृष्टीस पडायचा, मध्येच कधीतरी त्याची हाक ऐकू यायची नाहीतर आवाज कानावर पडायचा इतकंच!
उच्च रक्तदाबवाल्यांना कुठल्याही राईड्सवर बसायला बंदी होती. त्यामुळे आईची इच्छा असूनही तिला कशात बसता आलं नाही. सासूबाईंना तिथला गारठा सहन झाला नाही. त्यांना थंडी वाजून ताप भरला. त्यामुळे त्या गोळी घेऊन खोलीत झोपून राहिल्या. बाबा मात्र अर्धा दिवस होते आमच्याबरोबर. तो दिवस माझ्या विशेष लक्षात राहिला त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी मी आयुष्यात प्रथमच 'रोलर कोस्टर' नामक प्रकारात बसले. रोलर कोस्टरचं लहान रूप म्हणता येईल अशी एक राईड आधी दिसली, त्याच्यापासून सुरूवात करायचं ठरवलं. त्यात बसल्यावर आपल्याला मळमळलं नाही, पोटात ढवळलं नाही हे पाहून माझा उत्साह वाढला. मग मोठ्या रोलर कोस्टरवर बसायचं धाडस केलं. तिथे दोन ठिकाणी ३६० अंशात गिरकी घ्यायची होती. आधी २५-३० फ़ूट उंची गाठेपर्यंत मजा वाटली. पण खालच्या दिशेने जोरात निघाल्यावर मात्र वाट लागली. त्या वेगाचा, अचानक वळणांचा त्रास कमी करायचा असेल तर बेंबीच्या देठापासून जोरजोरात ओरडावं असं मी एकदा कुठेतरी वाचलं होतं. पण हा गृहपाठ न करता जरी मी गेले असते तरी चाललं असतं कारण ऊर्ध्व दिशा बदलून अचानक एका क्षणी जेव्हा आपण खालच्या दिशेनं वजनविरहित अवस्थेत तुफान वेगात निघतो तेव्हा ओरडण्याशिवाय गत्यंतरच नसतं!! त्यात पुन्हा मी माझे डोळेही घट्ट मिटून घेतले होते. मधली ती ३६० अंशाची दोन वळणं येऊन गेलेली आता अंधूक आठवताहेत मला... पण काही सेकंदांनंतर थांबल्यावर मात्र मेंदूत प्रचंड वावटळ येऊन गेल्यासारखं वाटत होतं थोडा वेळ!! पण मी खूष होते. कारण, इतके दिवस ज्या राईड्सकडे नुसतं पाहून मला पोटात ढवळायचं त्यांपैकी एका रोलर कोस्टरसारख्या महारथी राईडमध्ये त्या दिवशी मी चक्क बसले होते, ओरडले होते, हवेत गटांगळ्या खाल्या होत्या, गिरक्या घेतल्या होत्या .... मजा आली, त्रास झाला नाही पण का कोण जाणे, पुन्हा त्यात बसावंसंही वाटलं नाही. मात्र आधी द्विगुणित झालेला माझा उत्साह आता दशगुणित झाला होता. आता जरा आव्हानात्मक, उच्च्पदस्थ राईड्सकडेच माझं लक्ष जायला लागलं. एक Space Shot नामक राईड होती. एका ४०-५० फ़ूट उंच खांबावरून आपण बसलेला पाळणा खूप वेगाने वर खाली होतो. क्षणार्धात २५-३० फ़ूट वर, क्षणार्धात खाली .... बाकी काही नाही तरी दुपारनंतर त्या राईडमध्ये बसायचंच असं मी ठरवून टाकलं.
मी आणि बाबांनी आदित्यला आग्रह करून Go Carting ला पण नेलं. तो आधी तयार नव्हता - कदाचित चार चाकी गाडी चालवायची होती म्हणून असेल. तिथल्या त्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या म्हणजे खऱ्या गाड्यांच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती होत्या. मारे अगदी F-1 च्या थाटात आम्ही हेलमेट घालून गाडीत बसलो, सीट-बेल्ट्स लावले ... आदित्यसाठी तर ते सगळं एकदमच रोमांचकारी होतं. सगळ्यांची पूर्वतयारी होईपर्यंत अगदी शिस्तीत सिग्नलचा लाल दिवा वगैरे चालू होता. तो हिरवा झाल्यावर सगळ्यांच्या अंगात अचानक 'शूमाकर' संचारला. पण त्या भ्रमाचा भोपळाही लगेच फुटला कारण कितीही केलं तरी त्या गाड्यांचा वेग १०-१५ च्या पुढे जातच नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीनंच तशी तजवीज केलेली असणार म्हणा. १-२ फेऱ्या मारल्यावर मला आणि बाबांना तर कंटाळाच आला पण अर्ध्यातच थांबायला परवानगी नव्हती ... झक्कत त्या ४-५ फेऱ्या पूर्ण कराव्या लागल्या. आदित्यला मात्र खूपच मजा आली....
अर्धा दिवस संपत आला होता. आम्ही इकडेतिकडे भटकत होतो, मध्येच मनात आलं की एखाद्या राईडमध्ये बसत होतो .... त्या राईड्सप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त, ते तसं वयाचं, वेळेचं बंधन नसणं त्यादिवशी जास्त भावलं मला. दुपारी दोन वाजता इतरांबरोबर जेवायला जाणं मात्र अपरिहार्य होतं - ते सुध्दा वेळेचं बंधन म्हणून नव्हे तर नंतर एकट्याने गेलो असतो तर रस्ता सापडला नसता म्हणून...!!
जेवणानंतर सगळ्या आजी-आजोबांनी वामकुक्षीला प्राधान्य दिलं आणि आमच्यासारखे मात्र निघाले पुन्हा हुंदडायला. सकाळच्या त्या कोवळ्या किरणांनंतर दिवसभर सूर्य काही दिसला नाही. खूप धुकं होतं, गारठा होता पण तेच बरं होतं. स्वच्छ आकाश आणि कडक ऊन असतं तर मला वाटतं मी पण खोलीत बसून राहणं पसंत केलं असतं. लांबून Space Shot खुणावत होतं पण भरल्यापोटी लगेच कसं काय बसणार त्यात! मग एका निवांत ट्रेनमधून एक मोठी फेरी मारली, तिथल्या 'ग्रीन हाऊस'मध्ये पानं-फुलं बघत थोडा वेळ काढला. एका दुकानातून कॉफ़ीचा वास दरवळत आला. मग मस्त वाफाळती कॉफ़ी प्यायलो. तिथेच मक्याचे उकडलेले दाणे पण मिळाले गरमागरम. मजा आली ते पण खायला ...
अचानक वारा खूप जोरात वाहायला लागला, धुकं अजून दाटदाट व्हायला लागलं, गारठ्याचा बोचरेपणा अजूनच वाढला आणि एकएक करत सगळ्या राईड्स अपुऱ्या प्रकाशामुळे आणि धुक्यामुळे बंद झाल्या!!! नंतर सहा वाजेपर्यंत वाट पाहिली पण एकदोन अपवाद वगळता त्या पुन्हा सुरू नाही झाल्या. Space Shot मध्ये बसण्यासाठी एकवटलेला धीर सरळसरळ वाया गेला...!! पण आता त्याला काही इलाज नव्हता.
संध्याकाळनंतर तिथला 'कॅसिनो' बघायला जायचं होतं. वयोमर्यादा आणि वेशभूषा मर्यादा यांमुळे आदित्य आणि अजय दोघंही तिथे येऊ शकले नाहीत. पुरुषांसाठी लांब बाह्यांचा शर्ट आणि पॅंट घालणं आवश्यक होतं. तसा शर्ट नव्हता म्हणून अजय आणि १२ वर्षांखालील मुलांना आत प्रवेश नव्हता म्हणून आदित्य...!! वयोमर्यादा समजण्यासारखी होती पण जुगारच खेळायचा तर लांब बाह्या काय आणि अर्धी चड्डी काय - काय फरक पडणार होता कोण जाणे!! त्या दोन अटींत बसणारे इतर सगळे मग त्या कॅसिनोतून फिरून आलो. मला स्वतःला सुध्दा त्यात विशेष स्वारस्य होतं अशातला भाग नाही पण 'नाहीतर अश्याठिकाणी आपण जायची वेळ तरी कधी येणार' या शुध्द हेतूनं मी तिथे गेले होते.
तो जगातला सर्वात मोठा कॅसिनो आहे. दूरदेशातले लोक गेटींग हायलंडला केवळ त्या कॅसिनोसाठी येतात असं कळलं. तीन मजल्यांवरच्या मोठमोठ्या दालनांत निरनिराळ्या प्रकारांचे जुगार अगदी रंगात आले होते. छतावर लटकणारी प्रचंड झुंबरं आणि एकूणच प्रकाशयोजना अप्रतिम होती. उंची दारूचे ग्लास, सिगारेटी, लोकांचे वेष - सगळ्यांतून श्रीमंती नुसती ओसंडून वाहत होती. काहीही शारिरीक कष्ट न करता, बसल्याजागी, केवळ नशिबावर हवाला ठेवून पैसे कमवण्याची माणसाची वृत्ती अजबच म्हणायला हवी. आपल्यासारख्या नोकरी-धंदा करून, दिवसभर खपून भविष्याची चिंता करणाऱ्या मध्यमवर्गीयांना तिथली ती गर्दी पाहून 'आपण मूर्खपणा तर करत नाही आहोत' अशी शंका सुध्दा येईल कदाचित!! जुगार खेळणाऱ्यांच्यात स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. मी एक-दोन टेबलांपाशी थोडा वेळ थांबून इमानदारीत समोर काय चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण ओ की ठो कळलं नाही. बरं, सगळे व्यवहार शांतपणे चाललेले. त्यामुळे कानावर पडणाऱ्या शब्दांतून काही आकलन व्हावं तर ते ही नाही!! मला तिथली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तिथल्या त्या खोट्या नाण्यांची वर्गवारी करणारी यंत्रं!! त्या यंत्रात नाणी टाकली की क्षणार्धात दुसऱ्या बाजूने त्या-त्या नाण्यांच्या किंमतींप्रमाणे त्यांचे वेगवेगळे गट बनून बाहेर यायचे. तेच पहायला नंतर मला जास्त मजा आली. थोड्या वेळानं मात्र त्या सिगारेटचा धूर भरून राहिलेल्या खोल्यांमध्ये गुदमरल्यासारखं व्हायला लागलं.... 'उंची वातावरणात मध्यमवर्गीयांचा जीव गुदमरतो' हे विधान शब्दशः खरं ठरलेलं पाहून मला हसू आलं!!
रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. पुन्हा एकदा अनेक सरकत्या जिन्यांवरून वर-खाली सरकून रेस्तरॉंपाशी पोचलो. प्रवेशद्वारापाशीच एका भिंतीला लागून अनेक उंच, पारदर्शक बाटल्यांमध्ये मसाल्यांचे निरनिराळे जिन्नस भरून ठेवलेले होते - नुसते देखाव्याला. आदल्या दिवशी जेवायला गेलो तेव्हा तिकडे लक्ष गेलं नव्हतं. एखाद्या रेस्तरॉंच्या अंतर्गत सजावटीचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. बघायला खरंच छान वाटलं.
... मलेशियात येऊनसुध्दा चोवीस तास उलटून गेले होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर 'एक दिवस थीम पार्कमध्ये' या गोष्टीबद्दल आधी मी म्हणावी तेवढी उत्सुक नव्हते. दिवसभर आदित्य मजा करेल आणि आपल्याला फक्त त्याच्या मागेमागे फिरावं लागेल अशी काहीशी माझी कल्पना होती. पण चोवीस तासांनंतर माझं मत पूर्णपणे बदललेलं होतं. आदित्यच्या बरोबरीनं आम्ही पण तेवढीच धम्माल केली होती....आणि एक गोष्ट नक्की होती - जसा पॅरासेलिंगचा दिवस माझ्या कायम स्मरणात राहणार होता तसाच हा थीम पार्कमधला एक दिवस आदित्य कधीही विसरणार नव्हता....!!!
सेलामत दातांग ... !!!
निघताना हुरहूर लागावी इतकं कोलंबोत राहिलोच नाही. थायलंडमध्ये खरं तर सर्वात जास्त मुक्काम होता. पण थायलंड सोडतानाही तसं काही वाटलं नाही ... एक तर पॅरासेलिंगच्या प्रभावातून मन अजून बाहेर आलं नव्हतं, शिवाय सिंगापूरची उत्सुकता होती. पण त्यादिवशी सिंगापूर सोडताना मात्र प्रथमच मनाला थोडीशी हुरहूर जाणवली. अजून २-३ दिवस तिथे रहायला सगळ्यांना आवडलं असतं. बॅंकॉकच्या रस्त्यांवरची गर्दी, खाद्यपदार्थांचे कसेतरीच, उग्र वास - काहीतरी होतं टीका करण्यासारखं ... पण या देशाने मात्र नावं ठेवायला जागाच सोडली नव्हती!! दोन दिवसांत मुख्य ठिकाणं पाहून झाली तरी इतर ठिकाणं पाहण्याच्या निमित्तानं अजून तिथला वाढीव मुक्काम चालला असता. शिवाय आपल्या सहलीचा अंतिम टप्पा आता जवळ आलाय हे सुध्दा आत कुठेतरी सतत जाणवत होतं.
तरी त्यातल्यात्यात काहीतरी नाविन्य शोधायचं म्हटलं तर होतंच - त्यादिवशी आम्ही मलेशियाला जाणार होतो पण ते विमानानं नाही, तर बसनंच. अकरा-साडेअकराला आवरून खाली आलो. सामान आधीच खाली त्या छोट्या सरकत्या पट्ट्याजवळ जमा झालेलं होतं. सरहद्द ओलांडायची असल्यामुळे त्यादिवशी आमची रोजची बस नव्हती. त्याऐवजी सिंगापूरच्या दोन सरकारी बसेस दिमतीला होत्या. 'सरकारी बसेस असल्यामुळे थोडं जमवून घ्या' असा सौ.शिंदेंचा सबुरीचा सल्ला होता. मनात म्हटलं - जास्तीतजास्त काय होईल? बसच्या खिडक्यांचे पडदे साधे असतील, सीट्स कमी गुबगुबीत असतील, ए.सी. वगैरे विशेष नसेल ....'सिंगापूरची सरकारी बस' ही काय चीज आहे ते सेंटोसाला पाहिलं होतं. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. आणि तसंच झालं - आपल्या आराम बसच्या पुन्हा एकदा तोंडात मारतील अश्या त्या दोन सरकारी बसेस आल्या. थोडं इकडे आणि थोडं तिकडे असं दोन्ही बसेसमध्ये सगळं सामान चढलं. तितक्यात, चेहेऱ्यावरून मराठी वाटणारे एक गृहस्थ शिंदे पतिपत्नींशी 'काय, कसं काय' करून पूर्वीची ओळख असल्यासारखे गप्पा मारत उभे असलेले दिसले. जरा आश्चर्य वाटलं. मग शिंदेंनी त्यांची ओळख करून दिली. आदल्या दिवशी आम्हाला मस्त पुणेरी, घरगुती जेवण पुरवणारे ते हेच - श्री. आपटे. आदल्या दिवशीचं जेवण कसं वाटलं हे विचारायला ते मुदाम आम्ही निघायच्यावेळी हॉटेलवर आले होते. मूळचे पुण्याचेच, पण गेली ८-१० वर्षं सिंगापूरमध्येच वास्तव्याला असलेले. त्यांचा तिथे तोच व्यवसाय आहे. साधं जेवण, सणासुदीचं जेवण, पूजेचं-मुंजीचं-होम हवनाचं साहित्य ते तिथे राहत असलेल्या भारतीय माणसांना पुरवतात. अगदी चौरंग, जानवी-जोड पासून भटजीपर्यंत सगळं. मनात आलं - एकतर यांनी एखादा भटजी नोकरीला ठेवला असेल किंवा स्वतःच भटजी बनून जात असतील ठिकठिकाणी! कारण चेहेऱ्यावरून पक्के 'ए'कारांत पुणेकर होते पण पक्के व्यावसायिकपण वाटत होते. सिंगापूरला येऊन हा व्यवसाय करावा हे त्यांच्या मनात आलं यातच सगळं आलं. तो त्यांचा व्यवसाय तिथे इतका जोरदार चालण्यामागे सुध्दा मानवी स्वभावधर्मच आहे. आपल्या मूळ घरापासून, गावापासून, प्रदेशापासून लांब राहणाऱ्या लोकांना आपले धार्मिक कुळाचार पाळण्याची जास्त गरज वाटते नेहेमीच. तसं करून ते त्या परमुलखात, वेगळ्या वातावरणात आपला भारतीयपणा, मराठीपणा जपण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण आपला भारतीयपणा, मराठीपणा जपतोय हे तिथल्या इतर लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात .......
तर, त्यादिवशीसुध्दा प्रवासात आम्हाला जेवणाचे डबे मिळणार होते ते त्यांच्याकडूनच. ८-१० दिवस एकाच चवीचं मसालेदार पंजाबी जेवण जेवल्यानंतर दोन दिवस ते घरगुती जेवण म्हणजे खरंच एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. तसंही, केवळ दोन दिवसांच्या वास्तव्यातच सिंगापूरने तरी दुसरं काय केलं होतं? निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या पध्दतीने आम्हाला सुखद आश्चर्याचे धक्केच तर दिले होते. 'जीवन में एक बार आना सिंगापूर ...' हे अगदी खरं होतं!!! फक्त, ती ओळ अजून थोडी सुधारावीशी वाटली - 'जीवन में किमान आठवडाभर आना सिंगापूर'!!!
दोन दिवस तिथे सूर्यदर्शन झालेलं नव्हतं पण निघायच्या दिवशी मात्र सिंगापूरचा सूर्य पण आला निरोप द्यायला. निघाल्यावर साधारण अर्ध्या तासाने सिंगापूरच्या सीमेजवळ उतरलो. आमच्याबरोबरच आमचं सामानपण खाली उतरवण्यात आलं. आपापलं सामान घेऊन इमिग्रेशनच्या ऑफ़िसमध्ये जायचं होतं. म्हणजे प्रक्रिया सगळी विमानतळासारखीच, प्रवास फक्त बसचा होता. सुदैवाने गर्दी वगैरे काही नव्हती. शिवाय 'चार तास आधी चेक-इन' ही भानगड नव्हती. आमच्या गृपपैकी एका काकूंचा 'मलेशिया व्हिसा' मिळाला नव्हता. ते काम होतं. पण सगळंच पटापट आणि थोडक्यात उरकलं. त्या ऑफ़िसमधून सगळे बाहेर आलो. आता पुढच्या प्रवासासाठी मलेशियाच्या दोन बसेस उभ्या होत्या. त्या बसेसही एखाद्या विमानाच्या 'बिझिनेस क्लास'च्या तोंडात मारतील अश्या होत्या - एकदम ऐसपैस आणि मस्त!! चला, म्हणजे आता पुढचा ४-६ तासांचा प्रवास एकदम आरामात होणार होता.
पुण्याहून मुंबईला जावं इतक्या सहजतेने आम्ही सिंगापूरहून मलेशियाला चाललो होतो. सिंगापूर, मलेशिया हे पूर्व आशियातले देश आहेत यापलिकडे त्यांच्या भौगोलिक स्थितीकडे आपण विशेष लक्ष देत नाही. नकाशा नीट बघितला तर लक्षात येतं की हे दोन्ही शेजारी देश आहेत. मध्ये एक खाडी आहे म्हणून नाहीतर त्यांचे भूभाग पण एकमेकांना जोडले गेले असते. खाडीवरचा एक-दीड कि.मी. लांबीचा पूल हा त्यांच्यातला एकमेव दुवा आहे. तो भलाथोरला पूल म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना होता पण त्याचं नाव मात्र अगदी साधं - नुसतं 'कॉज-वे'!!! बांधकाम सुरू असलेल्या आपल्या 'वरळी-वांद्रे सागरी मार्गा'चं मला कोण कौतुक, नाव पण किती छान, घसघशीत - वरळी-वांद्रे सागरी मार्ग! आणि हा पूल त्याच्या कितीतरी आधी बनलेला, तेव्हा कदाचित सामान्य माणसाला जास्त नवलाईचा वाटला असणार. त्याला एखादं भारदस्त नाव शोभून दिसलं असतं!! 'कॉज-वे' म्हणजे माझ्या डोळ्यासमोर एखादा अरुंद, अगदी पाण्याजवळून नेणारा रस्ता आला होता.
असा तो 'कॉज-वे' ओलांडून आता आम्ही अजून एका नव्या देशात प्रवेश केला होता. मलेशियात प्रवेश केल्यावर आणि 'क्वालालंपूर - १७० कि.मी.' अश्या प्रकारच्या पाट्या दिसायला लागल्यावर मात्र सकाळची ती हुरहूर केव्हा मागे पडली ते कळलंही नाही. इथे घड्याळांतली वेळ बदलायचा वगैरे प्रश्न नव्हता - साधारण एकाच रेखावृत्तावर दोन्ही देश आहेत. मग रस्त्यावरच्या पाट्या वाचायला सुरूवात केली. पाट्यांवरची लिपी इंग्रजी पण भाषा मलाय होती. पण ते जरा बरं वाटलं. अर्थ नाही कळला तरी निदान शब्द तरी कळत होते; अगदीच थायलंडसारखी निरक्षराची गत नव्हती. ज्या ठिकाणी त्या पाट्या असायच्या त्यावरून अर्थाचा साधारण अंदाज बांधता यायचा.रस्ता एकदम निर्मनुष्य होता. मध्येच एखाददुसरी गाडी दिसत होती. विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मैलोगणती पामच्या झाडांची लागवड होती. मलेशियात प्रवेश केल्याकेल्या लगेचच त्या देशाचं वैशिष्ट्य म्हणून असलेली एक गोष्ट पहायला मिळाली आणि सिंगापूरप्रमाणेच मी मलेशियाच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडले. रस्त्याला लागून पामची झाडं, थोड्या दूरवरपण पामची झाडं आणि लांबवर दिसणाऱ्या उंच डोंगरांवर पण पामचीच झाडं!! ते बघायला फारच छान वाटत होतं - अगदी डोळ्यांचं पारणं फिटावं इतकं! काही वेळापूर्वी ती ऐसपैस बस पाहिल्यावर खरंतर मी एक मस्तपैकी झोप काढायचं ठरवलं होतं. पण त्या सुंदर पामच्या बागांनी माझी झोप कुठल्याकुठे पळवून लावली. तासाभरानंतर मुख्य रस्त्यावरून बस डावीकडे वळली. एके ठिकाणी १०-१५ मिनिटं थांबायचं होतं पाय मोकळे करायला. पामने मढलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याश्या हॉटेलपाशी उतरलो. तिथे नुकताच पाऊस पडून गेला होता. ढगाळ, दमट हवा होती. तिथल्या स्वच्छतागृहांवर 'lelaki' आणि 'wanita' अश्या पाट्या दिसल्या. लगेच लक्षात आलं की मलाय भाषेत 'पुरुष' आणि 'स्त्री' साठी अनुक्रमे 'lelaki' आणि 'wanita' हे शब्द आहेत. अर्थ कळल्यामुळे जाम आनंद झाला. पुढच्या दोन दिवसात मग मला तो नादच लागला - पाट्या वाचायच्या आणि त्याचा अर्थ काय असेल त्याचा अंदाज बांधत बसायचं. १५-२० मिनिटांत सगळे ’लेलाकी’ आणि ’वनिता’ पुन्हा बसमध्ये चढले आणि तिथून निघाले.
पुन्हा तासभर प्रवास आणि पुन्हा एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. आपापले डबे घेऊन तिथल्या रेस्तरॉंमध्ये शिरलो. आत शिरताक्षणी एक अत्यंत उग्र, कसातरीच वास नाकात शिरला. इतरवेळी अश्या वासाच्या ठिकाणी जेवणाची कल्पनाही सहन झाली नसती. पण त्या दिवशी नाईलाज होता. पामच्या झाडांप्रमाणेच या वासानेही पुढे दोन दिवस आमची पाठ सोडली नाही ... कारण तो वास पाम तेलाचाच होता!! इतक्या सुंदर झाडांच्या बियांपासून इतक्या घाणेरड्या वासाचं तेल निघतं?? अर्थात हा सवयीचा भाग होता. ज्या तेलाच्या वासाला मी नाकं मुरडत होते त्याच तेलात बनवलेले कसलेकसले पदार्थ तिथले लोक मिटक्या मारत खात होते. त्या लोकांच्या ताटांत आणि एकूणच तिथल्या काचेच्या कपाटांत जे-जे काही मांडून, टांगून, पसरून ठेवलेलं होतं ना ते शिसारी आणणारं होतं. नंतरच्या दोन दिवसांत मलाय पदार्थ चाखून पाहण्याची माझी इच्छा केव्हाच मेली होती. या सगळ्या पूर्व आशियाई राष्ट्रांत शाकाहारी माणसं फारच थोडी सापडतात आणि त्यांचा मांसाहार हा आपल्या कल्पनेपलिकडचा असतो. ते तसले पदार्थ तोंडात घालणं तर सोडाच, नुसते बघण्यासाठी पण मनाची बरीच तयारी करावी लागते.
आमचं जेवण चालू असतानाच तिथे एक मलाय कुटुंब आलं. त्यांतल्या ८-१० वर्षांच्या एका खट्याळ पोरानं आमच्या डब्यांत वाकून पाहिलं आणि जसं मी नाक मुरडलं होतं तसंच त्यानं आमच्या पुरी-भाजी, गुलाबजाम, दही-भात या जेवणाकडे बघून तोंड वाकडं केलं. तिथल्या तिथे फिट्टमफाट!! इतरही अनेक लोक आमच्या जेवणाकडे वळूनवळून पाहत होते. कदाचित मस्त, सुग्रास खेकड्याचं कालवण खाताना गोडेतेलाचा 'घाणेरडा वास' त्यांच्या नाकात शिरला असेल आणि त्यांच्या जेवणाची मजाच गेली असेल ...
दुसऱ्या बसमध्ये एक टूरिस्ट गाईड होती. तिने दिलेली प्राथमिक माहिती आमच्या सहप्रवाश्यांकडून कळली. मलाय भाषेत स्वागत करायचे असेल तर 'selamat datang' असं म्हणतात. ही अक्षरं तिथे हॉटेलमध्येही दिसली होती.
सकाळच्या प्रवासात मंडळींची एकएक डुलकी झालेली होती, आता जेवणंही झाली होती. तिथून निघाल्यावर मग बसमध्ये गाणी, गप्पा, जोक्स, नकला सुरू झाल्या. तो तास-दीड तास मजेत गेला.
संध्याकाळी क्वालालंपूर शहरात पोहोचलो. डावीकडच्या खिडकीतून लांबवर पेट्रोनास ट्विन टॉवर्स दिसले. मलेशियातली तेवढी एकच गोष्ट फक्त माहित होती, त्यामुळे सगळे 'बघू, बघू' करत डाव्या बाजूच्या खिडक्यांतून डोकावून पहायला लागले आणि एखादी नवलाईची गोष्ट सापडावी तसे खूष झाले. ते टॉवर्स पुढच्या दोन दिवसांत सतत दिसतच राहिले. जरा इकडे-तिकडे नजर वळवली की कुठेनाकुठेतरी दिसायचेच. पण त्या क्षणी ते माहिती नव्हतं. त्यामुळे आयुष्यातली ती जणू एक मोलाची संधी दवडण्याची कुणाची तयारी नव्हती.
त्यादिवशी आम्हाला क्वालालंपूरहून पुढे 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. 'गेंटींग हायलंड' - तिथलं एक प्रसिध्द थंड हवेचं ठिकाण - मलेशियाचं महाबळेश्वर!! क्वालालंपूर शहरात न शिरता बसने घाटरस्ता पकडला. जसजशी हवा गार-गार होत गेली, ढग-धुकं वाढायला लागलं, तसतसे ते पाम पांघरून बसलेले डोंगर अजूनच छान दिसायला लागले. वळणावळणाचा रस्ता पोटातल्या पाण्यात ढवळाढवळ करणार अशी लक्षणं दिसायला लागली होती. माझं पाट्या वाचण्याचं काम सुरूच होतं. त्या रस्त्यावर सतत 'ikut kiri' अशी एक पाटी दिसत होती. २-३ दिवसांच्या संशोधनाअंती त्याचा अर्थ 'Keep left' आहे असं लक्षात आलं. रंगरूप बदललं, देश-वेष बदलला तरी रहदारीच्या नियमांसारख्या काही गोष्टी लोकांच्या मनावर सतत बिंबवाव्याच लागतात. त्या बाबतीत जगभर एकवाक्यता दिसून येईल ... आणि त्या सतत बिंबवल्या जाणाऱ्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीतही!!
'गेंटींग हायलंड'च्या पायथ्यापाशी उतरलो तेव्हा दिवस पूर्णपणे बुडालेला होता. हवेत बोचरा गारवा होता. काहीजणांनी आपापले स्वेटर्स वगैरे बाहेर काढले. पुणेकरांचा गुलाबी थंडीबद्दलचा 'जाज्वल्य अभिमान' लगेच उफाळून आला. 'स्वेटर घातलेले सगळे मुंबईकर, न घातलेले सगळे पुणेकर' अशी थट्टा सुरू झाली. मुंबईकरांना नावं ठेवण्याची अशी नामी संधी पुणेकर थोडीच सोडणार होते ....
त्या पायथ्यापासून आम्हाला केबल कारने वर 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. ती आशिया खंडातली सर्वात मोठी केबल कार समजली जाते. गुडुप अंधारात, त्या एकमेव केबलच्या भरवश्यावर आमच्या निरनिराळ्या केबिन्सची वरात २००० मी. उंचीवरच्या त्या डोंगराच्या दिशेने निघाली. खाली उंचच्या उंच पर्जन्यवृक्षांचं निबिड अरण्य मिट्ट काळोखात एकदम भयाण वाटत होतं. 'Rain-forests of Malaysia ...' हे शब्द डिस्कवरीवरच्या कार्यक्रमांत अनेकदा ऐकले होते - तेच हे मलेशियातलं जगप्रसिध्द, घनदाट पर्जन्यवन. केबलला आधार देणाऱ्या मोठ्या खांबांजवळ तेवढा एखादा मिणमिणता दिवा असायचा. बाकी संपूर्ण अंधाराचं साम्राज्य होतं. अश्या ठिकाणी 'अचानक वीज गेली तर ...', 'काही बिघाड झाला तर ...' असल्या शंका हटकून मनात येतातच. केबिन्सच्या आतल्या बाजूला सुरक्षाविषयक सगळे नियम आणि सूचना लिहिलेल्या होत्या त्या आधी वाचून काढल्या. आदित्यला समजावून सांगितल्या. भीती अशी वाटत नव्हती पण नाही म्हटलं तरी अंधाराचा मनावर थोडा परिणाम झालेलाच होता. पण त्याबरोबरच हा प्रवास दिवसाउजेडी करायला तितकीच मजा येईल हे ही कळत होतं.
निसर्गावर मात करणं माणसाला कदापि शक्य नाही हे अश्या वेळेला पटतं. घनदाट जंगलातून उंच डोंगरावर सहजगत्या पोचण्यासाठी एक अत्याधुनिक वाहतुकीचं साधन उपलब्ध करणं म्हणजे कौशल्याचं काम होतं हे खरंच! माणसाच्या मेंदूला तिथे दाद ही दिलीच पाहिजे. पण म्हणून केवळ त्या बुध्दीच्या जोरावर निसर्गावर कुरघोडी करायचा कुणी आव आणत असेल तर निसर्ग त्याला अश्या ठिकाणी बरोब्बर त्याची जागा दाखवून देतो. शारीरिक इजा पोहोचू नये म्हणून खबरदारीचे अनेक उपाय योजता येतात पण त्या जीवघेण्या शांततेत, काळोखात बुडलेल्या दाट जंगलात हे पण कळून चुकतं की माणूस हा त्या सर्वशक्तिमान निसर्गाच्या दृष्टीने इतर किडा-मुंग्यांसारखाच!!
त्या अर्ध्या तासात मध्ये काही काळ तर असा होता की मागचं दिसेनासं झालं होतं आणि पुढची लोकवस्तीची चिन्हं दिसायला अजून वेळ होता. त्या अंधाराच्या साम्राज्याच्या दोन्ही टोकांना मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे हे सांगूनही कुणाला पटलं नसतं. थोड्या वेळानंतर वर लांबवर दिवे लुकलुकायला लागले. ३०-३५ मिनिटं ती तशी लटकत मार्गक्रमणा केल्यावर आम्ही उतरलो.
एखाद्या पर्यटनस्थळी जशी संध्याकाळच्या वेळी माणसांची गजबज, दिव्यांची रोषणाई वगैरे असते तशीच तिथे होती. हॉटेलच्या खोल्या ताब्यात घेतल्या, सामान टाकलं आणि जेवणासाठी पुन्हा बाहेर एकत्र जमलो. जेवणाचं ठिकाण तिथून थोडं लांब होतं. म्हणजे त्याच परिसरात होतं पण चालत जायला १५-२० मि. लागायची. आणि ते चालत जाणं म्हणजे सुध्दा प्रत्यक्ष चालणं कमी आणि सरकत्या जिन्यांवरून वर-खाली करणं जास्त होतं. त्या रिसॉर्टचे जमिनीखाली आणि वर मिळून जवळजवळ १२-१५ मजले होते. जेवणाचं ठिकाण सातव्या मजल्यावर होतं. आता तो सातवा मजला म्हणजे सुध्दा एकूणातला सातवा की जमिनीवरचा सातवा की जमिनीखालचा सातवा हे शेवटपर्यंत कळलं नाही. पण जवळजवळ ६-७ सरकत्या जिन्यांवरून सरकून (वर की खाली ते ही आता आठवत नाहीये!!) गेल्यावर आम्ही त्या जेवायच्या ठिकाणी पोहोचायचो. माझी तर दरवेळी त्या सरकत्या जिन्यांची मोजदाद चुकायची. पु.लं.च्या 'वाऱ्यावरची वरात' मध्ये कसा तो 'गरूडछाप तपकीर'वाला पु.लं.ना सांगतो - 'दोन डोंगर चढायचे, दोन उतरायचे - पायथ्याशी गावडेवाडी' तसंच काहीसं होतं तिथे - ४-६ सरकते जिने चढायचे, ७-८ उतरायचे, पायथ्याशी जेवण!! काय गंमत आहे ना ... कुठल्याही प्रसंगाचं वर्णन करताना पु.लं.ची आठवण हमखास येतेच. त्यांची कुठली ना कुठली तरी शाब्दिक कोटी, कुठला ना कुठला तरी विनोद त्या प्रसंगात चपखल बसतोच. मलेशिया हा जेव्हा अजून मलेशिया झालेला नव्हता तेव्हाचाही - पु.लं.च्या 'पूर्वरंग'तून माहिती होताच की!! म्हणजे मलाय देश आणि पु.ल. ही जोडी अगदीच विजोड नव्हती ...
रात्री १० च्या सुमाराला हॉटेलवर परतलो. घरातून निघाल्यापासून प्रथमच जरा सुखद थंडी अनुभवायला मिळत होती. ट्रीपला जायचं ठरल्यावर ती ठिकाणं थंड हवेची नाहीत म्हणून आदित्य सुरूवातीला थोडा खजील झाला होता. तो त्या थंडीमुळे जरा खूष झाला. त्याला आता दुसऱ्या दिवसाची उत्सुकता लागून राहिली होती कारण तिथला दुसरा दिवस हा त्याच्या वयाच्या मुलांच्या खास आकर्षणाचा असणार होता.
चार भिंतींतल्या सुरक्षित अंधारात सगळे झोपेच्या अधीन झाले. हा अंधार आणि काही तासांपूर्वीचा तो जंगलातला भयाण अंधार - दोन्हीत किती फरक होता .... !!!
आज सहज मनोगतावरील आपले खाते उघडून पाहिले आणि अस्मादिकांच्या सदस्यत्वाचे पहिले वर्ष पूर्ण होत आल्याची जाणीव झाली. "त्यात काय मोठं आहे?" किंवा "या वर्षात असे किती दिवे लावलेत?" असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ते खुशाल विचारू देत. एक वर्षाच्या पोराला नाक पुसण्याचीसुद्धा अक्कल आली नसली तरी काय झाले? कुशीला वळणे, पालथे पडून पुढे सरकणे, रांगणे, आधार धरून उभे राहणे असल्या क्रियांमधून त्याला जो महद आनंद मिळतो आणि कौतुकाने ते पाहणाऱ्या लोकांना जी मजा वाटते तिचे महत्त्व कांही त्यामुळे कमी होत नाही.