काही हरवलं काही गवसलं

नमस्कार मंडळी,

गणेशोत्सवाच्या सर्व वाचकांस मन: पुर्वक शुभेच्छा !!!

नोकरी निमीत्ताने चाकरमानी (या शब्दाचा नक्की अर्थ काय ?) मंडळी आपापले गाव सोडुन बाहेर पडली आणि पोटापाण्यासाठी साता-समुद्राकडे जाउन स्थायिक झाली. या सगळ्या उद्योगात काही हरवलं काही गवसलं.

आता हेच बघा आपल्या कडे लग्नातली धामधुम , तो गोंधळ, ते पाहुणे , नाव घेणं आणि चिडवा चिडवी, ह्या सगळ्याची मजा जशी, तशीच लग्नाच्या गर्दीत दिल्या घेतलेल्या नजरेच्या पावत्या  , केळवणं हे सगळे परदेशात जाऊन नुसतं आठवणीतच राहतं. साध एखादे नाटक पहायला जायच तर घरातल्यांचा थाट काय विचारता.त्याची मजा लायब्ररी तुन आणलेली डीव्हीडी टीव्ही वर पहाताना कशी येणार ? तर मंडळी अश्याच काही हलक्या फ़ुलक्या - खमंग गोष्टी आपणही  "मिस" करत असालच.

कोणाला सासुरवासातुन सुटल्याचा आनंद तर कोणाला भांडी स्वतः धुवावी लागतात (मशीन असले तरी) याचे दुख: , कित्येकांचा तर रविवारी "इस्त्रीवाला" होतो.

यावर सगळ्यात कडी म्हणजे परदेशातुन गावाला परत गेल्यावर जवळच्या प्रत्येकाला काही भेट दिल्यावर (हे काय , एवढच ?) चेहऱ्यावरचे प्रतिसाद.

गंमत सांगायची झाली तर  - पुणे सोडले आणि मुलींच्या शाळेत पालकांच्या मिंटींगला जाऊन शाळेचे ( जे उगाच )पोवाडे गावे लागायचे त्यातुन सध्या तरी सुटलो  

अश्याच गमती जमती, परदेशातले सांस्कृतिक धक्के याबद्दल काही हलके-फ़ुलके विचार दडले असल्यास आवर्जुन मांडावेत अशी नम्र विनंती.

विनम्र - शशांक

अवांतर : एखादी गोष्ट "मिस" करणे याला मराठी शब्द कोणी सांगेल काय ?