एक अनुभव

गेल्याच शनीवारची गोष्ट. मी, पती व सूनबाई, मुलगी व जावई मथुरा उपहारगृहात जेवायला गेलो होतो. मुलगी व जावई स्कूटीवर, आणि आम्ही तिघे रिक्षाने मथुराला गेलो होतो. जेवण झाल्यावर जावयाने नॅचरल्स मध्ये आईसक्रिम खायला जाण्याचे सुचवले. आम्ही गेलो. थोडी गर्दी होती म्हणून मुलगी म्हणाली की आई, तू दोन खुर्च्या धर आम्ही आईसक्रिम घेऊन येतो. मी एका खुर्चीवर माझी पर्स आणि दुसरीवर प्लॅस्टीकची कॅरीबॅग ठेवली. आईसक्रिम घेऊन ते दोघे आल्यावर पर्स उचलली आणि शेजारच्या रिकाम्या खुर्चीवर ठेवली.

'परतीचा प्रवास' - उदास करणारे संदिग्ध आत्मचरित्र

'वनमाला' हे नाव घेतले की स्वर्गीय देखणेपण समोर तरळते. लगेच 'श्यामची आई' आणि 'आचार्य अत्रे' ही दोन नावे धक्काबुक्की करीत पुढे येतात. 'पायाची दासी', 'वसंतसेना', 'लग्नाची बेडी' आदि मंडळी जरा मागच्या रांगेत थांबतात.

वनमालाबाईंना दीर्घायुष्य लाभले. त्यांची नव्वदी उलटल्यावर ऍड. सुनील पाटणकर यांनी शब्दबद्ध केलेले 'परतीचा प्रवास' हे त्यांचे आत्मचरित्र.

'उत्तरमामायण' - मधुकर तोरडमलांची चौथी घंटा

मधुकर तोरडमलांचे 'तिसरी घंटा' हे आत्मचरित्र प्रसिद्धच आहे. तोरडमल त्यामानाने तरुण आणि कार्यमग्न असतानाच ते लिहिले गेले.

त्याला पार्श्वभूमी अशी की अरुण सरनाईक या त्यांच्या अभिनेत्या मित्राचे अपघाती निधन झाले. ते होण्याअगोदर त्या दोघांचे असे ठरले होते की सरनाईकांनी आत्मचरित्र सांगायचे आणि तोरडमलांनी ते लिहायचे. त्यासाठी पंधरा दिवस पन्हाळ्याला जाऊन रहायचे असा बेतही शिजत होता. आणि अचानक अपघात झाला.

मृत्यू अटळ आहे...

एका घनदाट अरण्यात.. दररोज सकाळी.. एक हरण जागं होतं.. उठताक्षणी त्या हरणाच्या मनात एकच विचार येतो.. एकच लक्ष्य असतं... की आज आपल्याला सगळ्यात जलद वेगाने धावणाऱ्या सिंहापेक्षा वेगात पळता आलं पाहिजे.. जर मी हे करू शकलो नाही तर त्या सिंहाकडून आपला मृत्यू अटळ आहे...

सारे प्रवासी गाडीचे -१

रसायनशास्त्रात शिक्षण घेतल्यामुळे कारखान्यांत नोकरी करणे नशिबांत आले. मुंबईतले कारखाने बाहेर गेले पण घर हलवणे सोपे नव्हते. म्हणून रोज लांबचा प्रवास करणे स्वीकारले. सुरवातीला ओळखी होईपर्यंत बराच शारिरिक व मानसिक त्रास सहन केला. नंतर जसजशा ओळखी वाढत गेल्या तसतशी या जीवघेण्या प्रवासाचासुद्धा आनंद घेण्याची मानसिक तयारी झाली. या ओळखी साध्या नसतात. त्यातून गाढ मैत्रीचे धागे गुंफले जातात. कालांतराने तो प्रवास जरी संपला तरी ते मित्र तसेच जिवाभावाचे रहातात. दहा वर्षांच्या रोजच्या प्रवासांत असंख्य माणसे भेटली. कांही चटका लावून जाणारी तर कांही चटके देणारी. आता मागे वळून पाहिले की जाणवते की ही आयुष्यात मिळालेली, शिकण्याची एक मोठी संधी होती. त्यातीलच कांही निवडक वल्लींची मनोगतींना ओळख व्हावी या हेतूने ही व्यक्तिचित्रे आपल्यासमोर मांडणार आहे.
बहुतेक व्यक्ति खऱ्या नांवानेच आपल्यासमोर येतील. अगदीच विचित्र वागणाऱ्यांना मात्र  दुसऱ्या नांवाने संबोधणार  आहे.

एसीपी मनोहर

टिप:-'एसीपी मनोहर ' ही कथा अर्ध्यावर अस्तानाच प्रसिद्ध झाली.तिचा पुढील भाग ,माझ्या दि.२१-९-०७ च्या प्रतिसादामध्ये आहे . त्यापुढला भाग हा खालील प्रमाणे )

एसीपी मनोहरना ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा ,बाहेरच्या जगत हिंडण्यात जास्त आनंद वाटे . त्यानी परिचय होण्यासाठी म्हणून स्टाफ मिटींग घेतली . मिटींग मध्ये त्यानी  सांगितले. ''आपले काम काय आहे हे प्रत्येकाला ठाऊक आहे . ते करा . त्यांचे अहवाल वेळच्यावेळी द्या . सबबी सांगू नका. गिव्ह युवर दि बेस्ट ! '' त्यांच्या नजरेत , चुकलात तर गय नाही , असा भाव होता.

अवतार

सर्वत्र धूसर निळा प्रकाश पसरला होता. पायतळी त्याच प्रकाशाच्या पायघड्या होत्या, पण ते जे काय होते ते घन आहे, द्रव आहे की वायू आहे हे समजत नव्हते. डोक्यात घनदाट सर्दी भरलेली असताना सर्व जगाकडे पाहण्याचा एक निरीच्छ दृष्टीकोन जसा आपोआपच आपल्या नजरेत विरघळून जातो तसे त्याला वाटत होते.

मानवी नातेसंबंधांचा सुगंध - खुशबू

KHUSHBOO

परवा बऱ्याच दिवसांनंतर 'बेचारा दिल क्या करे ' हे गाणं ऐकलं आणि अचानक मला विस्मरणात गेलेल्या 'खुशबू' या सिनेमाची आठवण झाली. १९७५ साली प्रदर्शित झालेला हा एक साधा सोपा शालीन सिनेमा. सोपा, पण सरळ नाही. शरदचंद्र चटर्जींच्या कथेवर आधारित गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला 'खुशबू' मानवी नात्यांचा खोलवर धांडोळा घेतो. माणसांमाणसांमधील गुंतागुंतीची नाती हा बासु भट्टाचार्य यांच्यासारखाच गुलजार यांचाही आवडता विषय. ती गुंतागुंत वाढवायला नियती नावाचे एक अदृष्य जाळे सगळीकडे  पसरले आहे. त्यातल्या चुकीच्या धाग्यावर पाय पडला की सगळे बेत, सगळ्या योजना, सगळी स्वप्नं - सगळं कुस्करलं जातं. हे सगळे माणसाच्या शक्तीबाहेरचे, कदाचित कल्पनेबाहेरचेही....
डॉक्टर वृंदावनच्या आणि कुसुमच्या आयुष्यातही असेच काहीसे झाले आहे. काही गैरसमज झाले आणि त्यांचे ठरत आलेले लग्न मोडले. वृंदावनच्या आयुष्यात काहीशा अपघातानेच आलेल्या लाखीबरोबर त्याचे लग्न झाले खरे, पण चरणला त्याच्या पदरात टाकून तीही निघून गेली. इकडे अपमानित कुसुमने लग्न केले नाही. आपला दुखावलेला स्वाभिमान आणि वृंदावनची आठवण सोबत घेऊन ती आपला भाऊ कुंज याच्याबरोबर त्याच खेड्यात रहाते आहे. गरीबीत, पण अभिमानाने.
अशातच चरणला आणि आपल्या आईला घेऊन वृंदावन गावी परत येतो. कुसुमचे आयुष्य पुन्हा ढवळले जाते. अजूनही तिच्या मनात वृंदावनविषयी कुठेतरी ओलावा आहे. त्याच्याबरोबरच्या सहजीवनाची स्वप्ने अजून पुरती विझलेली नाहीत, पण याबरोबर वृंदावनच्या वडिलांकडून झालेल्या अपमानाचा घावही अद्यापि ठसठसतो आहे. वृंदावनच्या आईलाही आपल्या मुलाचा संसार परत सजलेला पहायचा आहे. या विचित्र मनस्थितीतून आता सरळसरळ उत्तर निघणार असे वाटतानाच परत सगळे विस्कटते, परत माणसाच्या हतबलतेची खात्री पटावी असे काहीसे होते, पुन्हा एकदा कुसुमला  लांब निघून जाणाऱ्या वृंदावनचे पाठमोरे चित्र पहावे लागते...
अर्थात इतके 'जी. ए.' पण काही हिंदी चित्रपटाला परवडत नाही. या कथेचा सुखांत होतो खरा, पण अगदी हुलकावण्या देत देत. अशी ही सरधोपट म्हणावी अशी कथा. पण गुलजार यांनी तिला -अगदी गुळगुळीत शब्द वापरायचा झाला तर- जी 'ट्रीटमेंट' दिली आहे, तिने 'खुशबू' एक चांगला सिनेमा झाला आहे. गुलजारच्या 'ऑल टाईम ग्रेट' मध्ये समाविष्ट व्हावा इतका नसला तरी दीर्घकाळ स्मरणात रहावा असा नक्कीच. सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे, हे मी यापूर्वीही म्हटले होते, ते परत म्हणावेसे वाटावे, इतका. एक दिग्दर्शक म्हणून गुलजार यांनी संजीवकुमारचा सर्वोत्कृष्ट वापर करुन घेतला, यात नवल वाटण्यासारखे काही नाही. पण जीतेंद्रसारख्या निव्वळ शाडूच्या गोळ्याला त्यांनी 'खुशबू' मध्ये ('परिचय' प्रमाणेच) चक्क चांगला अभिनय करायला लावले आहे. एकतर चष्मा, मिशी आणि पांढरा झब्बा पायजमा हा (गुलजार यांचा स्वतःचाच?) गेट अप जीतेंद्रला शोभून दिसतो. त्यातून गुलजार यांचेच अर्थपूर्ण संवाद त्याने किंचित अंडरटोनने सुरेख खुलवले आहेत. पण 'खुशबू' चे सगळ्यात मोठे यश आहे ते म्हणजे हेमामालिनी. 'ड्रीम गर्ल' वगैरे अशी विशेषणे आसपासही फिरकू नयेत, आणि इतर चित्रपटातल्या तिच्या त्या दमेकरी 'नहीं...' ची आठवणही येऊ नये अशी एक संपूर्ण वेगळी आणि भारदस्त हेमामालिनी 'खुशबू' त दिसते. तिचा स्वाभिमान, तिचे वृंदावनवरचे प्रेम, पण या प्रेमाच्या मोहात पाडून तिला गृहीत धरण्याची चूक वृंदावनच्या आईकडून होताच आपल्या मानासाठी आपले सुख सोडून देण्याइतपतचा तिचा बाणेदारपणा, वृंदावनच्या मुलात तिची झालेली भावनिक गुंतवणूक आणि या सगळ्याच्या मागे दिसेल न दिसेलसे उभे असलेले तिचे सच्चे माणूसपण... गुलजार यांना या भूमिकेकडून यापेक्षा काही जास्त अभिप्रेत असावे असे वाटत नाही. याच काळात ती म्हणे 'शोले'चे ही शूटिंग करत होती. पण इथली तिची कुसुम बसंतीपेक्षा कितीतरी वेगळी, कितीतरी अस्सल वाटते.
'हम अंग्रेजोंके जमाने के जेलर हैं' हा विदूषकी संवाद आणि तसलीच ती विदूषकी भूमिका यातून बाहेर पडण्यासाठी असरानी या गुणी नटाला हृषिकेश मुखर्जी, गुलजार आदि मंडळींनी चांगल्या भूमिका दिल्या हे किती बरे झाले! नाही तर असरानी शक्ती कपूर आणि राजेंद्रनाथसारखा सारखा असह्य झाला असता. कुंजची या चित्रपटातली दुय्यम भूमिका असरानीने झोकात केली आहे (अभिमान, चुपके चुपके, नमकहराम या चित्रपटांसारखीच). आणि 'खुशबू' मधली फरीदा जलाल ही केवळ नंबर एक. एक तर तिचा 'स्क्रीन प्रेझेन्स' हा कमालीचा गोड आणि खानदानी आहे. त्यातून तिचा नितांतसुंदर अभिनय. तिची कुसुमबरोबरची मैत्री, त्यांच्या चेष्टामस्करी, नदीवर पाणी भरायला जाणे (आणि तिथले ते अप्रतिम गाणे).... अगदी बोलताबोलता वेणीच्या शेपट्याशी खेळणे आणि होणाऱ्या नवऱ्याच्या नावाच्या चोरट्या उल्लेखाने लाजणे... या अभिनेत्रीचे जेवढे व्हायला पाहिजे होते तेवढे चीज झाले नाही असे मला राहून राहून वाटते. बाकी दुर्गाबाईंच्या अभिनयाविषयी काय लिहावे? तो केवळ पहावा असा. तो सगळीकडे जसा असतो तसाच अप्रतिम 'खुशबू' मध्येही. मास्टर राजूचा उल्लेख बाकी इथे मुद्दाम केला पाहिजे. लहान मुलांकडून नैसर्गिक अभिनय करुन घेणे हे फारच कठीण आहे. एकतर ती मुले कमालीची अवघडलेली वाटतात, किंवा अत्यंत आगाऊ अशी. गुलजार यांनी हे अवघड काम कैक वेळा यशस्वीरीत्या करुन दाखवले आहे ('परिचय'). चरण हा आईवेगळा मुलगा आणि त्याची आई होण्याची स्वप्ने पहात असणारी कुसुम यांच्यातले प्रसंग रानात दूरवर एखादे अलगुज वाजावे असे आहेत. पहात रहावे असे आणि पहाता पहाता घशात आवंढा आणणारे.
गुलजार आणि आर. डी. बर्मन यांची वाईट अशी गाणी फारशी नसावीतच. 'दो नैनोंमे आंसू भरे है' हे लताबाईंचं गाणं आठवा आणि अंधाऱ्या नदीच्या प्रवाहातून होडी पलीकडे जात असताना वल्ह्यांच्या चुबुक चुबुक तालावरचं ' ओ माझी रे' आठवा. 'बेचारा..' तर आहेच.

याच 'बेचारा दिल क्या करे' ने मला 'खुशबू' ची इतक्या दिवसांनंतर आठवण झाली.

थुंकला कोण? शालेय आठवणी!

मी लहान असताना म्हणजे शाळेत १९९४ मध्ये पहिलीत असताना एक घटना घडली होती. जी मला आजही सतवतेय? माझ्या शाळेचे नाव ज्ञानसागर विद्यालय आहे.मी शाळेत पहिलीत असताना दुपारी शाळा सुरू झाल्यावर वर्गात बसलो होतो व माझ्यापुढे एक मुलगी बसली होती.त्यात पावसाचे दिवस चालू होते. काय म्हणू त्या मुलीला एक नंबरची कुसकी होती,नाही तर काय? शाळा सूरु झाल्यानंतर ती वर्गात माझ्या पुढच्या बाकावर ती बसली. आणि आमच्या वर्गातल्या बाई आम्हाला शिकवत होत्या. त्यामध्ये मी एक वेडा.मी माझ्या वहीचे पान माझ्या तोंडात टाकुन चघळत होतो. चघळता चघळता फूक मारल्यावर तोंडामधले वहीचे पान तीच्या शर्टावर जाऊन पडले.आणि आता काय आता तर माझी वाटच लागली होती. ती मुलगी बाकावरून ऊठली व सरळ बाईंकडे जाऊन माझे नाव सांगितले, की बाई हा समीर माझ्या शर्टावर थुंकला.

काळ आणि अवकाश : आईन्स्टाईन व पुढे..

काळ आणि अवकाश : आईन्स्टाईन व पुढे..
- प्रा. अभय  अष्टेकर
मराठी अनुवाद : वरदा वैद्य

लेखकाविषयी थोडेसे – अभय अष्टेकर हे पेन्सिल्वेनिया राज्य विद्यापीठामध्ये (पेन स्टेट) १९९४ सालापासून विद्यादान करीत आहेत. ‘द इबर्ली फॅमिली’ चे अध्यक्ष असून ‘पेन स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅविटेशनल फिजिक्स ऍण्ड जिओमेट्री’ ह्या संस्थेचे ते संचालक आहेत. आईन्स्टाईनचा गुरुत्व वाद (Einstein’s classical theory of gravitation) व सापेक्षतावाद ह्या विषयांतील संशोधन, तसेच गुरुत्व-पुंजवादाच्या (Quantum theory of gravity) निर्मितीतील त्यांच्या योगदानासाठी ते नावाजले गेले आहेत. पदार्थविज्ञान व भूमिती ह्यामधील, विशेषत: कृष्णविवरांसंदर्भातील परस्परसंबंधांचे विश्लेषण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नवीन घटकांचा (variables) वापर करून त्यांनी सापेक्षतावादाचे पुनर्सूत्रीकरण (reformulation) केले व आता ही सूत्रे त्यांचा नावाने ओळखली जातात. गुरुत्व-पुंजवादाच्या जडणघडणीमध्ये तसेच प्रगतीमध्ये ह्या सूत्रांनी मोठाच हातभार लावला आहे. हे संशोधन कालावकाशाच्या रचनेचे एक वेगळे गणिती स्पष्टीकरण करते. ह्या स्पष्टीकरणानुसार, सूक्ष्मतम अंतरांच्या श्रेणीमध्ये (smallest scale) कालावकाशाची (spacetime) रचना ही धाग्यांप्रमाणे  (polymer-like) असते. पेन स्टेट मध्ये येण्यापूर्वी त्यांनी सिराक्यूझ विद्यापीठ (न्यू यॉर्क), फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठ व डी क्लेरमाँट-फेरँड विद्यापीठ, शिकागो विद्यापीठ, आणि युनायटेड किंगडममधील ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे विविध पदे भूषविली होती.
________________________________________________________