मुंबईत राज समर्थकांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे अमराठी प्रसारमाध्यमांमार्फत विचित्र संदेश गेला आहे. महाराष्ट्रात रहाता तर मराठी संस्कृती आपलीशी करा, आमची भाषा शिकून घ्या हे म्हणणे कुणाला अमान्य असण्याचे कारण नाही. पण दुर्देवाने राजच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे माध्यमांमधून फक्त हिंसाचारालाच हायलाईट केले जात आहे. शिवाय अमिताभसंदर्भातील विधाने, त्याच्या घरावरील कथित हल्ला हे मुद्दे पुढे येताहेत आणि मुंबईत किंवा महाराष्ट्रात इतर भाषकांनी येऊच नये काय असा प्रश्न विचारणार्या आणि राजचे आंदोलन हा प्रसिद्धीचा स्टंट असून त्या ला अटक करावी अशी मागणी करणार्या प्रतिक्रिया प्रत्येक वेबसाईटवर वाचायला मिळत आहेत.
राजचा किंवा मराठी भाषकांचा अमराठी लोकांना अजिबात विरोध नाही. पण बिहार व युपीमधून आलेल्यांनी जी घाण मुंबई व लगतच्या भागात केली आहे, त्याला विरोध आहे. गुजराती व मारवाड्यांना, पंजाब्यांना किंवा दाक्षिणात्यांनाही हा विरोध नाहीये. पण माध्यमातून चित्र असे निर्माण केले जात आहे की हा प्रादेशिकतावाद निर्माण केला जात आहे. एका प्रतिक्रियेत एकाने लिहिले होते, की मुंबई व महाराष्ट्राची जी आजची प्रगती दिसतेय ती अमराठी उद्योजकांमुळेच. त्यामुळे पाच तरी बड्या मराठी कारखानदारांची नावे लिहून दाखवा असा प्रतिसवाल त्याने केला होता. त्यावेळी मात्र, मला खरोखरच वाईट वाटले.मराठीत मराठी.वेबदुनिया.कॉम येथे येथे मी एक लेख वाचला, तोही विचार करण्यासारखा वाटला.