गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम)

(शिर्षक हे सुरीनाम नावाच्या देशाचे राष्ट्रगीत आहे. )

माझे लग्न ४ जानेवारी २००५ ला  होवून लगेचच ९ जानेवारी ला मी गिरीश बरोबर सुरीनाम नावाच्या देशात गेले. तेथील Suralco नावाच्या ऍल्युमिनिअम च्या  प्लॅंट मध्ये तेव्हा गिरीश च्या कंपनी चे ६ engineers प्रोजेक्ट साठी तिकडे गेले होते. त्यांच्यात गिरीश चाही समावेश होता.   त्यांच्यापैकी आणखी २ जणांची कुटुंबे देखिल होती. तिकडे जाण्यासाठी ५ जानेवारी ला आम्ही मॅरेज सर्टीफीकेट मिळवले आणि ६ तारखेला गिरीश च्या कंपनीत व्हिसा साठी डोक्युमेंटस देउन आलो. ८ तारखेला आमच्या हातात व्हिसा आला. आणि आम्ही ९ तारखेला निघालो सुद्धा. हे सगळे दिवस अतिशय गडबड चालू होती. त्याच्यात पॅकिंग ही होतेच. तरी नशिब आम्हाला मुंबई हून फ्लाईट न मिळाल्याने पुणे ते दिल्ली डोमेस्टीक आणि मग पुढे इंटरनॅशनल फ्लाईटनी आम्ही ऍमस्टरडॅम ला गेलो. आणि मग तिथून पुढे सुरीनाम ला गेलो. त्यामुळे मुंबई ला आम्हाला जावे लागले नाही. तरी पण गिरीश ला इंटरनॅशनल ड्राइव्हर्स परमिट घेण्यासाठी १ दिवस मुंबई ला जावे लागले. जाताना दिल्ली एअरपोर्ट वर आमची बरीच चौकशी केली. कारण सुरीनाम ला जाणारे लोक नसतील च जवळपास. दिल्ली डोमेस्टीक एअरपोर्ट ते दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट तसे अंतर बरेच आहे. पण आमची जाण्याची सोय जेट एअरवेजनीच केल्याने सगळे सुरळीत पार पडले.
सुरीनाम हा देश दक्षिण अमेरिका खंडात ब्राझिल च्या उत्तर दिशेला आणि ब्रिटीश गयाना, फ्रेंच गयाना च्या मध्ये वसलेला आहे. ह्या देशाची राजधानी पारामारिबो आहे. तिकडे जाण्याच्या आधी मला ह्या देशाबद्दल काहीच माहिती नव्हती. तसेच कोणी ह्या देशात गेल्याचे ऐकिवात ही नव्हते. म्हणून मग मीच लग्नाच्या आधिपासूनच इंटरनेट च्या सहाय्याने आणि गिरीश च्या अनुभवांवरून माहिती मिळवायला सुरुवात केली होती.
ह्या देशाचे हवामान दमट आणि उष्ण आहे. पाउस पण बराच पडतो. राष्ट्रभाषा टोंगो म्हणून आहे. डच भाषेशी  बऱ्यापैकी साम्य आहे. बोलली जाणारी भाषा ताकीताकी आहे. देश लहान आहे. क्षेत्रफळ १६३, ८२० km² आहे. भात आणि केळी यांची शेती केली जाते. लोकसंख्या सुमारे   ४४०, ०००  आहे. तेथील रहिवासी सुरिनामी, हिंदुस्तानी, चायनीज आणि जावानीज़ आहेत. १८ व्या शतकात ब्रिटिश लोकांनी उत्तर भारतीयांना  (बिहारी लोकान्ना) सुरीनाम मध्ये bauxite च्या खाणीन्मध्ये काम करण्यासाठी नेले होते. हेच ते तेथील हिंदुस्तानी लोक. हे लोक हिंदी भाषा बोलतात. पण त्यांची हिंदी तशी खूप च जुनी असल्याने समजून घ्यावी लागते. आपले हिंदी चित्रपट आणि बॉलिवूड सुरीनामीन्मध्ये लोकप्रिय आहे. आम्ही पुण्याचे (मुंबई हून फक्त ३ तासान्वर आहे) असे म्हणालो की लगेच तिकडचे लोक विचारायचे की तुम्हाला अमिताभ बच्चन रस्त्यात दिसतो का? बोलतो का लोकान्शी?
हा देश विकसित नाहीये अशी कल्पना गिरीश नि आधीच मला दिल्याने ह्या देशाबद्दल माझ्या मनात खेडेगावासारखा अशीच प्रतिमा होती. परंतु एअरपोर्ट वरून घरी जाताना मला दिसले ते खड्डे नसलेले रस्ते आणि ट्रॅफिक चे नियम पाळणारे लोक. तिथे दुचाकी गाड्या कमी आणि चारचाकी गाड्या जास्ती आहेत. सगळे सिग्नल पाळत होते. हॉर्न वाजवत नव्हते.
तिकडे पोचल्यावर  गिरीश च्या ग्रुप कडून आमचे खूप च जंगी स्वागत झाले. आमच्यासाठी एकाच्या घरी डिनर पार्टी होती. ग्रुप मधले सगळेच खूप co-operative होते. आमचे घर म्हणजे संदीप, तृप्ती बरोबर चे ट्वीन बंगल्यातले शेयर केलेले घर होते. तृप्ती पण स्वभावानी चांगली असल्याने मी तिकडे लगेचच set  झाले. पण २ऱ्या दिवशी सकाळी ६ ला गिरीश ऑफिस ला जायला निघाला. त्या दिवशी मलाही जेटलॅग होताच म्हणून गिरीश नि डबा नेलाच नाही. मी उशिरा उठून मग unpack केले. घर ही लावत होते.   आणि अधून मधून झोपत ही होते. प्लॅंट घरापासून सुमारे ४५ मिनिटे अंतरावर असल्याने आणि काम ही खूप असल्याने गिरीश खूप च उशिरा घरी यायचा. तृप्ती पण प्लॅंट वर जायची म्हणून त्या दिवशी अक्ख्या बंगल्यात मी १ टी च होते. आणि मी झोपलेली असताना अचानक जोरजोरात आवाज यायला लागला.