नमस्कार!! आज मला सासर आणि माहेर कडील पद्धती आणि मधल्यामध्ये नवीन सुनेची होणारी ओढाताण याबद्दल चर्चा करायची आहे.
नवीन सून जेव्हा घरी येते.. तेव्हा तिच्याकडून नवीन पद्धती शिकून घेईल अशी अपेक्षा केली जाते... आताच्या ह्या युगात मुलींकडून अश्या अपेक्षा योग्य आहेत का? तिच्या माहेर कडून आलेल्या सगळ्या पद्धती ती एकाएकी कशी टाकून देईल?? अशी अपेक्षा तिच्याकडून का करावी?? अणी तिने तसे नाही केले तर तिला अन माहेर च्या माणसांना बोल लावले जातात... हे योग्य आहे का?